संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

युनियन बँक ऑफ इंडिया – संगमनेर क्षेत्रातील सर्व शाखांच्या संयुक्त विद्यमाने मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी वित्तीय समावेशन मेळावाचे यशस्वी भव्य आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत बँकिंग सेवा, विमा योजना, पेन्शन योजना आणि विविध शासकीय आर्थिक योजनांचा लाभ पोहोचवणे हा होता.

मालपाणी लॉन्स येथे यां कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उप महा प्रबंधकचे सुभाष केशव,सुनील कुमार यादव,सुभाष गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात PMSBY, APY, SHG Loan, PMEGP, PMFME, CMEGP यांसारख्या योजनांवर मार्गदर्शन सत्र घेण्यात आले तर PMJJBY योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना DD प्रदान करण्यात आले, ज्यामध्ये चिखली व कोकणगाव शाखेतील प्रतिनिधी लाभार्थ्यांचा समावेश होता. तसेच पात्र लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संदीप पवार,रवी खैरनार,बालाजी बोरुडे,भागवत मोरे,विक्रम जाधव यांनी केले तर या कार्यक्रमाप्रसंगी बचत गट, उमेद अभियान अंतर्गत नोंदणीकृत गट, ग्रामपंचायत प्रतिनिधी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ध्वनीत शिंदे यांनी केले.तर सुभाष गजभिये यांनी उपस्थित मान्यवर, आयोजक व सहभागींचे आभार मानले.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *