आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रतापपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक निवृत्ती पाटील इलग सभागृहात सोसायटी चेअरमन गजानन आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

राज्याचे जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , सौ शालिनीताई विखे पाटील , माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीची वाटचाल पारदर्शक असून झालेल्या सभेत लाभांश वाटप , थकबाकीदार, सभासद आणि कर्मचाऱ्यांसाठी सहकारी प्रशिक्षण यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभासदांनी सक्रिय सहभाग घेत आपापली मते मांडली. तर जिल्हा सहकारी बँकेचे आश्वी शाखाधिकारी वाकचौरे यांच्या सत्कार करण्यात आला .
या महत्त्वपूर्ण सभेला शिवनेरी उद्योग समूहाचे प्रमुख भगवानराव इलग पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण सांगळे, दिनकरराव आंधळे , सुखदेव आंधळे , पोलिस पाटील विठठलराव आंधळे , कचेश्वर आंधळे , सरपंच पांडुरंग आंधळे, माजी सरपंच दत्तात्रय आंधळे, आमदार विखे पाटील ट्रक सोसायटीचे संचालक शिवाजी इलग, रंगनाथ आंधळे, लक्ष्मणराव आंधळे, शिवराम आंधळे, भीमाशंकर आंधळे, सुनील सांगळे, दगडू आंधळे यांच्यासह सोसायटीचे चेअरमन गजानन आव्हाड आणि व्हाईस चेअरमन सखाराम आंधळे यांच्या नेतृत्वाखालील संचालक हरिभाऊ आंधळे, दादा आंधळे, दिलीप आंधळे, एकनाथ सांगळे, शंकर खामकर, दादा इलग, बबन घुगे, अशोक बिडवे, सौ. शांताबाई गीते, सौ. रुख्मिणीबाई आंधळे , संस्थेचे सचिव संदीप उनवणे , सेल्समन प्रमोद नागरे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद या सभेला उपस्थित राहिल्याने सभेचे महत्त्व अधोरेखित झाले.
उपस्थित मान्यवर आणि सभासदांनी संस्थेच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या हितासाठी विविध सूचना केल्या. या सभेमुळे संस्थेच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येण्यास मदत होईल आणि सभासदांचा सहभाग वाढण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली .


