संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये युवा कार्यकर्ते मोहित गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, भाऊ प्रतिष्ठानच्या वतीने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचे दिसले .
या प्रसंगी सोसायटीचे चेअरमन विजयराव भोसले, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलराव गायकवाड, भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास साहेबराव गायकवाड, सचिव सतीश निवृत्ती गायकवाड, अनिल शिंदे, राहुल जेडगुले, बंडू मांढरे, विशाल शिरतार, मयूर शिंदे, विशाल गव्हाणे, यशवंत वाल्हेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य सागर भडकवाड, विकास भडकवाड सर, बबलू गायकवाड, अक्षय गायकवाड, शिरसागर आणि प्राथमिक शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मोहित गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. भाऊ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. तर शिक्षण आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय वस्तू मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होते. भाऊ प्रतिष्ठानने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून, अशा उपक्रमांमुळे समाजातील गरजूंना मोठा आधार मिळतो, असे मत अनेकांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊ प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले