जीवनात ध्येय स्पष्ट असेल आणि त्याला प्रयत्नांची जोड असेल तर यश तुमच्या पायाशी आपोआप नतमस्तक होईल, जीवनात सूर्य बनून काम करता नाही आलं तर पंती बनून काम करा. व्यक्तीकडे जर वकृत्व, कर्तुत्व असेल तर, नेतृत्व करायला समाज संधी देतो, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आदींच्या कर्तुत्वाचे दाखले त्यांनी यावेळी दिले,
सामाजिक विषयावर आधारित लोकगीतातून त्यांनी यावेळी प्रबोधन केले.
विद्यार्थीदशेतच सामाजिक बांधिलकीची, राष्ट्रनिष्ठेची जाणीव मनात निर्माण झाली पाहिजे. ध्येय निश्चित म्हणजे केवळ स्वप्न बघणे नव्हे, तर त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणे होय, ध्येय जितके स्पष्ट तितका आत्मविश्वास दृढ होत जातो. उत्तम शिक्षण घेणे, चांगल्या सवयी लावणी, नियमित वाचन करणे या सर्व गोष्टींच्या शिदोरीमुळे आपल्या अस्तित्वाच्या पाऊल खुणा सापडत जातात. असे मत सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे संचालक मा. प्रा. बाबा खरात यांनी व्यक्त केले.
ते सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापनादिन कार्यक्रमात बोलत होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बी. डी. वाघ, होते, यावेळी आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. डॉ. लक्ष्मण घायवट, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. व्ही. बी. बैरागी, डॉ. संगीता दंडवते, डॉ. डेरे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेश मंजुळ, डॉ. राजेंद्र गायकवाड, प्रा. नानासाहेब दिघे, डॉ. हासे. प्रा. महेश हजारे, प्रा. मनोज आंबरे, प्रा. वर्षा साबळे, उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. बी. डी. वाघ यांनीही अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. लक्ष्मण घायवट यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. स्नेहल थिटमे यांनी केले तर आभार डॉ. राजेंद्र गायकवाड यांनी मांनले.