आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्थेची ३५ वी सर्वसाधारण सभा चेअरमन प्रमोद सतीश बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. संस्थेचे संस्थापक दिलावर शेख यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली संस्थेची वाटचाल अत्यंत पारदर्शकपणे आणि प्रगतीपथावर सुरू असल्याचे या सभेत अधोरेखित झाले.

या महत्त्वपूर्ण सर्वसाधारण सभेत संस्थेशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये कर्ज वसुली हा प्रमुख विषय होता, ज्यावर सदस्यांनी आपले विचार मांडले आणि भविष्यातील धोरणांबाबत विचारमंथन केले. संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला आणि आगामी वर्षासाठीच्या योजनांवरही चर्चा झाली.

यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन सुभाष मुन्तोंडे, अब्दुल सत्तार शेख, अमीन शेख, कारभारी मांढरे, रमेश मुन्तोंडे, भाऊसाहेब मुन्तोंडे, भिमराज सांगळे, निवृत्ती नागरे, सौ कल्पना शेजवळ , सौ वैशाली रक्टे बाळासाहेब मुन्तोंडे, विश्वास मुन्तोंडे, बबन बिडवे, शिवाजी आव्हाड, बाळासाहेब पाबळ, हौशीराम पाबळ , सुर्यभान मुन्तोंडे, भाऊसाहेब रक्टे, सलिम शेख, बाळासाहेब म्हस्के, भैयासाहेब मांढरे, भाऊसाहेब मैदड, जेहूरभाई शेख, भिमराज भोसले, प्रकाश मुन्तोंडे, मधुकर मुन्तोंडे, रसुल रोख, आण्णासाहेब गिते, रामनाथ मुन्तोंडे, पांडूरंग मुन्तोंडे , राजेंद्र नागरे , अमर शेख , पप्पू शेख , लक्ष्मण गोडगे , चेतन म्हस्के , सोमनाथ बोंद्रे , रामनाथ मुन्तोंडे , अमोल मुन्तोंडे , किसन नागरे आदींसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

या सभेमुळे संस्थेच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येऊन सभासदांचा सहभाग वाढण्यास मदत झाली आहे. भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्था ही शिबलापूर आणि परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा आर्थिक आधारस्तंभ बनली आहे, असे मत या प्रसंगी अनेकांनी व्यक्त केले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *