शब्दगंध प्रकाशित आणि भागवत बाळासाहेब गिते लिखित “ती” या कादंबरीचे प्रकाशन पिंप्री लौकी, अजमपूर, ता. संगमनेर, जि. अ.नगर येथे महंत ओंकारव्यास शास्त्री बाबा यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. संदीप तपासे सर उपस्थित होते.
आपल्या भाषणात महंतांनी कादंबरीचे आणि लेखकाचे मनापासून कौतुक केले तसेच पुढील लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. डॉ. तपासे यांनीही कादंबरीविषयी सविस्तर विवेचन करून तिचे मनोगत मांडले, लेखकाचे कौतुक केले आणि उज्ज्वल साहित्यप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला राजेंद्र पाटील चकोर, प्रा. कान्हु गिते, अशोक गिते सर, भाजपा जिल्हा सचिव भारतराव गीते, संजय खरात (विकास अधिकारी), संजय मुंतोडे, दातीर गुरुजी, भिमाजी राहिंज यांची विशेष उपस्थिती लाभली.