संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील रहिवासी व हौशिराम सोनवणे आणि योगेश सोनवणे यांच्या मातोश्री, कै. श्रीमती केसरबाई रामराव सोनवणे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोनवणे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी सोनवणे परिवाराच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दिवंगत केसरबाई सोनवणे यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख म्हणाले की, “केसरबाई ह्या शांत, प्रेमळ आणि धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने सोनवणे परिवाराला मोठा धक्का बसला आहे. या दुःखातून सोनवणे परिवाराला सावरण्यासाठी ईश्वर त्यांना शक्ती देवो, अशी ही प्रार्थना केली.”
या सांत्वनपर भेटीदरम्यान कारखान्याचे संचालक रामनाथ कुटे, राजेंद्र देशमुख आणि गणेश पवार हे देखील उपस्थित होते. सोनवणे कुटुंबाच्या दुःखात देशमुख आणि उपस्थित सर्व मान्यवर सहभागी झाले होते.