सौ.दुर्गाताई तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटाचे कौतुकास्पद काम
संगमनेर । झुंझार न्यूज
महिला सबलीकरणासाठी कार्यरत असलेल्या जय हिंद महिला मंच व एकवीरा फाउंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात बचत गटांचे मोठे जाळे निर्माण झाले असून सौ.दुर्गाताई तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली खांडगाव येथील अष्टविनायक महिला बचत गटाच्या परताव्याच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला दीपावलीनिमित्त 15 लिटर तेलाचा डबा देण्यात आला आहे.

खांडगाव येथे सौ.अर्चनाताई बालोडे यांच्या पुढाकारातून कार्यरत असलेल्या अष्टविनायक महिला बचत गटांनी महिला सबलीकरणाचे मोठे काम केले आहे. याचबरोबर महिलांमध्ये आर्थिक समृद्धता निर्माण करताना आरोग्य व शैक्षणिक जागृती निर्माण केली आहे. महिलांनी केलेल्या बचतीतून सर्व महिलांना दीपावलीनिमित्त 15 लिटर तेलाच्या डब्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सौ.अर्चनाताई बालोडे,सौ.साधना घुले, सौ.वनिता बालोडे, सौ.लता बालोडे, सौ.नंदा बालोडे, सौ.संगीता बालोडे,सौ.सुनीता बालोडे, सौ.माधुरी बालोडे,सौ.मीरा बालोडे,सौ.मंदा घुले,सौ.सुनंदा बालोडे, सौ.सुनीता घुले आदी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना सौ.अर्चनाताई बालोडे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात महिला सबलीकरणाचे मोठे काम झाले आहे. जयहिंद व एकविराच्या माध्यमातून सुमारे 3000 बचत गट कार्यरत असून उमेदच्या माध्यमातून आम्हाला कायम सहकार्य मिळाले आहे.सौ.दुर्गाताई तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटातून मोठे संघटन झाले असल्याने महिलांना अडचणीच्या काळामध्ये या बचत गटातून मोठी मदत होते याचबरोबर विचारांची देवाणघेवाण होऊन आरोग्याबाबतही महिला जागृत होतात. दीपावलीनिमित्त दरवर्षी काहीतरी भेट आम्ही देत असतो यावर्षी पंधरा लिटर तेलाचा डब्बा देताना आम्हाला आनंद होत असल्याच्या त्या म्हणाल्या.
यावेळी सर्व महिलांनी उमेद व एकवीरा आणि जय हिंद महिला मंचचे अभिनंदन केले आहे.



