{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

जोर्वे । झुंझार न्यूज

संगमनेर शहर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा दिवाळीनंतर फटाके फुटणार असल्याने दिवाळी शुभेंच्छा , भेटवस्तू या माध्यमातून इच्छुक कार्यकर्त्याची सफेद पेहरावामधून भावगर्दी दिसू लागली आहे. ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती करिता आरक्षण जाहिर होताचं इच्छुकांची चाचपणी सुरू होवून आपण प्रवाहात असल्याचे जाणीव करून देण्याची कार्यकर्त्यांची धडपड होताना दिसून येत आहे.

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदार संघातील असणारा जोर्वे जिल्हा परिषद गटाकरिता नागरिकाचा मागास प्रवर्ग व जोर्वे व अंभोरे गणाकरिता सर्व साधारण आरक्षण निघाल्याने काँग्रेस व भाजपसह विविध पक्षाच्या इच्छुकांची चाचपणी सुरू झाली हा गट म्हणजे थोरातांचे माहेर घर, तर विखे पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ असल्याने विखे थोरात कार्यकर्त्यांची सरळसरळ लढत असून दोन्हीकडूनही विविध नावांची जोरदार चर्चा होताना दिसत असून याकडे संपूर्ण जिल्ह्याचे याकडे लक्ष लागणार आहे .

जोर्वे जिल्हा परिषद गट म्हणजे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील महत्त्वाचा जि. प. गट असून या गटात येणारी निम्मी गावे हे संगमनेर मतदारसंघातील, तर निम्मी गावे हे शिर्डी मतदारसंघातील आहेत. या दोन्ही नेत्यांचा मोठा प्रभाव या गटावर आहे. या भागात बहुतांश वर्षांपासून विखे आणि परिवाराशी येथील लोकांची नाळ जुळलेली असल्याने मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कार्यकर्ते संच मोठा प्रमाणात आहे, तर स्वतः चे गाव, विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून व जुन्या ऋणानुबंधाने बाळासाहेब थोरात यांचा परिसरावर प्रभाव आहे. थोरात विखे एकत्र असो अथवा नसो २०१९ पर्यंत सोयीचे निवडणुकीचे राजकारण दिसले. मात्र, मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विखे थोरात कॉंग्रेस पक्षात असताना सुद्धा विखेंनी जोर्वे गटात, तर थोरातांनी आश्वी गटात अपक्ष उमेदवार देवून कार्यकर्त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. दोन्ही ठिकाणी अपक्षाची दाळ शिजली नाही. मात्र, विरोधाची मात्र ठिणगी पडली. कुठलाही कार्यक्रम असो एकमेकांवर टीका टिपणी दिसून येत आहे. आता दोन्ही नेत्यांची भूमिका वेगळी, पक्ष वेगळा असल्याने मिनी मंत्रालयात सत्ता मिळविण्यासाठी बालेकिल्ल्यापासून संपूर्ण जिल्हयात जोरदार प्रयत्न होणार यात तीळमात्र शंका नाही. जोर्वे जिल्हा परिषद गट हा पाहिजे तसा सोयीस्कर नसून विविध जाती-धर्माचे, सुशिक्षित व सधन लोक असून राजकारणा विषयी जाणकार असून हा बागायत भाग असताना सुद्धा विखे – थोरातांच्या भोवती वलय दिसत आहे. सहकाराच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी आपले वर्चस्व निर्माण करून कार्यकर्ते निर्माण केले. दोन्ही विधानसभेच्या सीमेवरील ही गावे आहेत.

 

दिवाळीनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतकरिता इच्छुक सज्ज झालेत . मात्र, वरिष्ठांचा कोणावर आशीर्वाद पडेल सांगता येत नाही. थोरात गटाकडून महानंदा राज्य दूध संघाचे माजी चेअरमन तथा संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, सामाजिक कार्यकर्ते डॉ राजेंद्र कोल्हे , थोराताचे कट्टर विरोध म्हणून तालुक्यात नावाजलेले शरद नाना थोरात हे नुकतेचं थोरात गटात सामिल झाल्याने से सुध्दा उमेदवारीचे प्रमुख दावेदार मानले जात आहे , यापुर्वी सदस्य होण्याची संधी हुकल्याने आता तरी संधी मिळेल या अपेक्षेने विनायकराव  थोरात हे आहेत ,  तर  विखे गटाच्या गोकूळ दिघे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे ना. विखे पाटील यांनी कामाला लागा असे आदेश दिल्याची चर्चा होत आहे मात्र इच्छुकांची गर्दी खूप दिसत आहे . पचायत समिती माजी विरोधी पक्ष नेते सरूनाथ उंबरकर हे सुध्दा इच्छुक असून महायुतीच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादी करिता सोडावी ही त्यांची मागणी असून विखेची भूमिका ही महत्वाची ठरणार असल्याने इच्छुक आपापल्या परीने फिडींग लावण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे .

अंभोरे गण सर्वसाधारण झाल्याने इच्छुकांची भावगर्दी

जिल्हा परिषद जोर्वे गटातील अंभोरे गण हा सर्वसाधारण पुरुष निघाला असला तरी या गणातून जाती समिकरण होवू शकतो अशी चर्चा आहे त्यामुळे धनगर वंजारी समाज्याकडे उमेदवारी होण्याची चिन्हे दिसत आहे थोरात गटाकडून अंभोऱ्याचे माजी संरपच भास्कर खेमनर , राजहंस दूध संघाचे संचालक विक्रमराजे थोरात , सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेबखंडूजगनर , राजकिय वलयाची पार्श्वभूमी असलेले तरुण युवक तथा बुवाजी बाबा पुणेकर यांचे नातू  राहुल  खेमनर , पोर्टी व्यावसायिक तुळशीराम मलगुंडे , मालुंजेचे माजी उपसरपंच संतोषनागरे , सुभाषराव हळनोर तर विखे गटाकडून संदिपराव घुगे यांचे नाव चर्चत असून त्यांनी कामाला लागण्याचा आदेश असल्याच  बोलले जात आहे . तर शिक्षकीपेशातील व विखे समर्थक प्रा . नानासाहेबतळेकर , रामभाऊ घुगे , डिग्रसचे विदयमान संरपच अशोकराव खेमनर , कोंडाजी कडनर ,आदीची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

जोर्वे गण सर्वसाधारण झाल्याने इच्छुकांची भावगर्दी

जोर्वे गणातून थोरात गटाकडून सुरेश थोरात , सामाजिक कार्यकर्ते डॉ राजेंद्र कोल्हे , ॲड रामदास शेजूळ तर विखे गटाकडून भाजपा जिल्हा सचिव सचिन शिंदे , दिलीप इंगळे , शिवाजीराव कोल्हे , गणेश भूसाळ तर रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आशिष शेळके आदीसह अनेक जण इच्छुक आहे  

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *