बाळासाहेब थोरात व रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते लक्ष्मी पूजन संपन्न
संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाने यंदाच्या दिवाळीत तालुक्यातील दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद पेरला आहे. माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते संघाच्या कार्यालयात लक्ष्मी पूजन करण्यात आले.
यावेळी व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, संचालक लक्ष्मणराव कुटे, आर.बी. रहाणे, विक्रम राजे थोरात, शम्प्रो चेअरमन रामहरी कातोरे , विलास कवडे , संतोष मांडेकर , विलासराव वर्पे , भास्करराव सिनारे , बबन कुन्हाडे ,बादशहा वाळुंज , संजय पोकळे , रमेश गुंजाळ ,विष्णू ढोले , तुकाराम दातीर , रविंद्र रोहम , भारत मुंगसे , प्रमोद पावसे , कार्यकारी संचालक डॉ. सुजीत खिलारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी, तालुक्यातील दूध उत्पादकांची दिवाळी गोड व्हावी, या उदात्त हेतूनेच दूध संघाने पुढाकार घेतल्याचे सांगितले. संघाकडून ४१ कोटी रुपये तर तालुक्यातील विविध सहकारी संस्थांकडून शेतकऱ्यांना रिबेट (सवलत) म्हणून देण्यात आलेल्या रकमेमुळे एकूण ८६ कोटी रुपये दूध उत्पादकांच्या खात्यात जमा झाले आहेत. या विशाल आर्थिक मदतीमुळे दूध उत्पादकांसह तालुक्यातील गोरगरीब आणि व्यापाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे.
देशमुख पुढे म्हणाले की, ८६ कोटी रुपयांच्या या आर्थिक मदतीमुळे तालुक्यातील बाजारपेठा अक्षरशः फुलून गेल्या आहेत. ही किमया केवळ तालुक्यातील सहकार चळवळीमुळेच शक्य झाली आहे. स्व. भाऊसाहेब थोरात यांनी दूरदृष्टीने सहकाराची मुहूर्तमेढ रोवली आणि ती जोपासली. त्यांच्या या कार्याचे स्मरण करून, पुढे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सहकार चळवळ अधिकच वेगाने प्रगती करत आहे. या चळवळीमुळे शेतकरी आणि गोरगरीब माणूस आर्थिकदृष्ट्या स्थिरावला आहे, असेही देशमुख यांनी नमूद केले.

याप्रसंगी, उपस्थित सर्व मान्यवरांनी तालुक्यातील जनतेला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाने उचललेल्या या पावलामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून, शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.”
Post Views: 566

