आश्वी आणि जोर्वे गटातील कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन; शिर्डी एमआयडीसीमुळे रोजगाराच्या संधींची ग्वाही
आश्वी । झुंझार न्यूज
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे संकेत दिले आहेत. तरुणांनी आपले भविष्य घडवण्यासाठी हीच योग्य वेळ असून, केवळ दुधाच्या व्यवसायावर अवलंबून न राहता तांत्रिक शिक्षण घेण्याचे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले .
आश्वी आणि जोर्वे गटातील गावांतील कार्यकर्ता मेळावा व कार्यकर्त्यांशी हितसंवाद प्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर हे होते.

यावेळी नामदार विखे पाटील यांनी आगामी निवडणुकांबद्दल म्हणाले की, लवकरच निवडणुकांचे तीन टप्पे होतील अशी शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात नगर परिषदेच्या निवडणुका, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, तर तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन केले तर शिर्डी विधानसभा मतदारसंघात आपण ऐतिहासिक विजय मिळवला असून, आपल्या पराभवासाठी अनेकांनी प्रयत्न केले, मात्र त्यांची स्वप्ने भंग झाली, असे ते म्हणाले. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कणखर नेतृत्वामुळेच भाजपला २८८ पैकी १३५ तर महायुतीला २०० पेक्षा जागा मिळाल्याने हे मोठे यश मिळाले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

नामदार विखे पाटील पुढे म्हणाले की, मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी निधी कमी पडू दिला नाही. निधीची कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही दिली तर अतिवृष्टीदरम्यान जोर्वे, कोल्हेवाडी आणि उंबरीसह अनेक नुकसानग्रस्त गावाची पाहणी करत नुकसानग्रस्तांना मदत मिळवून दिली. एकट्या संगमनेर तालुक्याला २० कोटी रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाले. भविष्यात अशा अतिवृष्टीमुळे नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. प्रत्येक गावातील ओढे-नाले स्वच्छ करून त्यातील अतिक्रमणे काढून टाकण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. तसेच, सर्व केटीवेअर दुरुस्त करण्यात येणार आहे . आता पाण्याचे महत्त्व आता सर्वांना समजले असून, यावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत शिर्डी एमआयडीसीमुळे रोजगार निर्मितीला मोठे महत्त्व प्राप्त होणार असून, मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. तेव्हा आता वशिलेबाजी संपली असून, तुमच्या शिक्षणावरच भरती होणार आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या शिर्डीत येण्यास तयार असल्याने, तरुणांनी बाहेर जाण्याची तयारी ठेवावी आणि केवळ दुधावर अवलंबून न राहता किमान आयटीआयसारखे तांत्रिक शिक्षण घ्यावे असे आवाहन करत गावातील विविध तंट्यांमध्येच अडकून राहू नका. आपली दृष्टी बदला आणि येणाऱ्या पिढीचे भविष्य ठरवा. आपल्या कुटुंबाचा आधार बना. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपासून याची सुरुवात करा. आश्वी आणि जोर्वे येथे इच्छुक कार्यकर्ते जास्त असल्याने थांबलेल्यांना योजना तयार करावी लागेल असे ते गंमतीने म्हणाले. सर्वांनी मिळून काम केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. तर नुकतेच झालेले शिवपुराण आणि अमित शहा यांचे दोन मोठे कार्यक्रम यशस्वी झाल्याचे नमूद करत हे कार्यक्रम पक्षाच्या वाढीसाठी आणि जनसामान्यांशी जोडणी साधण्यासाठी महत्त्वाचे ठरले .

यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला .

याप्रसंगी आण्णासाहेब भोसले , रामभाऊ भूसाळ , सरुनाथ उंबरकर , कैलासराव तांबे, भगवानराव इलग, संदिपराव घुगे , गोकूळ शेठ दिघे , मच्छिद्र थेटे, आर डी कदम, संतोष रोहोम, भारतराव गीते, पोपटराव वाणी, सुरेश नागरे , सतिष जोशी , कान्हू गीते, नाना पाटील शिंदे, अशोक तळेकर, मोहित गायकवाड, नाना कदम, बाळासाहेब कदम, रमेश गीते, अशोक गीते , गणेश भूसाळ , अशोक जऱ्हाड , अनिल म्हसे , आदींसह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 649

