संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

 

भारताच्या माजी पंतप्रधान तथा आयर्न लेडी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अमृत उद्योग समूहाच्या वतीने शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8.30 वा. शक्ती स्थळ अमृत नगर येथे मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.

 

याबाबत अधिक माहिती देताना पांडुरंग पाटील घुले म्हणाले की स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे देशाच्या उभारणीत मोलाचे योगदान आहे. पाकिस्तानला धडा शिकवत बांगलादेशची निर्मिती करणाऱ्या इंदिरा गांधी यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणास्त्रोत असलेल्या इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन दरवर्षी कारखान्यावर साजरा करण्यात येतो यानिमित्त वेगवेगळ्या मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली जातात. यावर्षी शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात ,मा आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड माधवराव कानवडे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी बाजीराव पाटील खेमनर, सौ दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ,सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, इंद्रजीत भाऊ थोरात,रामहरी कातोरे ,राजेंद्र गुंजाळ, राजेंद्र कडलक ,अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे ,अर्चना बालोडे, सुरेश झावरे ,निखिल पापडेजा, हैदर अली, गौरव डोंगरे, विश्वासराव मुर्तडक, प्रा. बाबा खरात, हौशीराम सोनवणे, आर.बी राहणे, लक्ष्मणराव कुटे , लहान भाऊ गुंजाळ, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी या अभिवादन कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक नागरिक व महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *