नागपूर । झुंझार न्यूज

 

 

राज्याचे माजी दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या मातोश्री श्रीमती लीलाबाई छत्रपाल केदार यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या दुःखद प्रसंगी, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाचे ( महानंदा ) माजी अध्यक्ष आणि राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी नागपूर येथील सुनील केदार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

 

 

 

रणजितसिंह देशमुख यांनी केदार कुटुंबायांना धीर दिला आणि दिवंगत लीलाबाई केदार यांच्या प्रति आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या भेटीदरम्यान, देशमुख यांनी लीलाबाई केदार यांच्या सामाजिक कार्याची आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली.

 

 

 

यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे संचालक विलास शिंदे , सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र देशमुख , मर्चंट बँकेचे संचालक श्याम भंडागे आदी उपस्थित होते .

 

 

 

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *