संगमनेर । झुंझार न्यूज

महानंदा राज्य दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराज्य निर्माण संघटना, संगमनेर यांच्या वतीने जोर्वे गावात गरजू महिलांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. रणजितसिंह देशमुख यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन युवकांनी केले होते.

 

याप्रसंगी रावसाहेब काकड, संतोष जाधव, राजेंद्र थोरात, कैलास इंगळे, शांताराम दिघे, रवी दिघे, दिगंबर इंगळे, जगन दिघे, सुनील दिघे, बाळू कोळगे, बंटी यादव, धनु इंगळे आणि अमित थोरात यांच्यासह शिवराज्य निर्माण संघटनेचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

कार्यक्रमादरम्यान, उपस्थित मान्यवरांनी रणजितसिंह देशमुख यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. शिवराज्य निर्माण संघटनेने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, समाजात आदर्श निर्माण करणारा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

 

या सामाजिक उपक्रमामुळे रणजितसिंह देशमुख यांच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाला असून, गरजू महिलांना मदतीचा हात मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *