आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील मालुंजे ग्रामपंचायत आणि प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एक भव्य सर्वरोग निदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिरामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या विविध तपासण्या आणि उपचार एकाच छताखाली उपलब्ध झाले.

प्रकल्प प्रमुख डॉ. बट्ट यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील विविध विभागांतील डॉक्टरांनी शिबिरात आलेल्या लोकांच्या आरोग्याची तपासणी केली. यामध्ये आवश्यक चाचण्या करून नागरिकांना योग्य निदान तसेच गोळ्या आणि औषधे देखील उपलब्ध करून देण्यात आली.
![]()
याप्रसंगी भाजपा तालुका उपाध्यक्ष संदीप घुगे यांनी नागरिकांना आरोग्याच्या तपासण्या करून घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत आरोग्याच्या विविध समस्या लोकांना भेडसावत आहेत आणि ग्रामीण भागात लवकर आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत आरोग्य शिबिर आयोजित करून लोकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविल्या जात आहेत.

प्रवरा ट्रस्टचे प्रमुख डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. डॉ. भट यांनी यावेळी बोलताना सांगितले की, प्रवरा ग्रामीण रुग्णालय ट्रस्टच्या माध्यमातून मालुंजे गावात हे आरोग्य शिबिर घेण्यात आले. सरपंच आणि ग्रामस्थांनी यासाठी मोठे सहकार्य केले, असेही त्यांनी नमूद केले.

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन भाजपा तालुका उपाध्यक्ष संदीपराव घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बढे, विलास घुले, अनिकेत पावडे यांच्यासह अनेक डॉक्टर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामुळे मालुंजे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने मोठा लाभ झाल्याचे दिसून आले.
