आश्वी । झुंझार न्यूज

बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या कु. नंदिनी प्रेमदास चव्हाण रा . तळेगाव (ता. चाळीसगाव) या उस तोडणी कामगारांच्या मुलीवर बिबट्यांने  कोपरगांव येथे हल्ला केला होता यामध्ये ती मयत झाल्याने हिच्या वारसांना शासनाच्यावतीने तातडीची मदत म्हणून दहा लाखाचा धनादेश जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.  

 

 

जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाकडे विशेष प्रयत्न करून २५ लाख रकमेपैकी तातडीची मदत १० लाख रुपयाचा धनादेश वारसांना प्रदान आला.बुधवार दिनांक ५/११/२०२५ रोजी सायंकाळी ७ ते ७:३० वाजे दरम्यान ऊस तोड कामगारांच्या झोपडी शेजारी कु. नंदिनी प्रेमदास चव्हाण ही खेळत असताना बिबट्याच्या हल्ल्यात मयत झाली. चव्हाण कुटुंब हे चाळीसगाव येथून ऊस तोडणीसाठी कोपरगांव येथे आले आहे. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील यांनी शासनाच्या वतीने २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यांनतर आज वनविभागाने तातडीची मदत म्हणून दहा लाखाचा धनादेश वारसदार प्रेमदास गोरख चव्हाण यांना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अहिल्यानगरचे सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी गणेश मिसाळ, वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के, वनरक्षक प्रतिक गजेवर उपस्थित होते. 

 

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विशेष प्रयत्नातून जिल्ह्यासाठी आठ कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती सौ विखे पाटील यांनी देत असताना पालकांसह सर्वांनीच बिबट्यांबाबत सतर्क रहावे असे आवाहनही सौ विखे पाटील यांनी केले.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *