आयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदीर भारतीय अस्मितेचे प्रतिक असून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदीरावर फडकावलेला भगवा ध्वज हिंदू धर्माच्या संस्कृती आणि परंपरेचा सन्मान असल्याची भावना जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिरावर झालेला ध्वजारोहण सोहळा संपूर्ण विश्वात हिंदू धर्माच्या संस्कृती परंपरेचा संदेश देणारा असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.आजचा दिवस देशाच्या अध्यात्मिक परंपरेसाठी ऐतिहसिक क्षण ठरला आहे.मंदीर निर्माणाचे पूर्ण झालेले काम आणि कळसावर भगवा ध्वज फडकावण्याचा मंगलमय सोहळा निश्चित उर्जा देणारा आहे.
अहील्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळेल असा विश्वास व्यक्त करून काॅग्रेस या निवडणुकीतून हद्दपार झाली असल्याचे सांगितले.महाविकास आघाडीला जिल्ह्यात उमेदवार उभे करता आले नाहीत.स्थानिक पातळीवर आघाड्या करून लढण्याची वेळ त्यांच्यावर आल्याची टिका मंत्री विखे पाटील यांनी केली.
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपा राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या उमेदवाराचा विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त करून समोरच्या उमेदवाराचे कर्तृत्व तिथल्या नागरीकांनी अनुभवले असल्याचे सांगितले.कोपरगावच्या निवडणुकी बाबत कालच सर्व भूमिका स्पष्ट केली असून,निवडणुका लढताना संयम आवश्यक असतो उथळपणा चालत नाही एवढेच मी सांगितले तिथेही भाजपाचे उमेदवार विजयी होतील.
लाडकी बहीण योजने बाबत महायुती मधील मंत्री किंवा नेत्याकडून होणार्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे पाटील म्हणाले की या योजनेवर नेत्याकडून होणारी वक्तव्य हा महायुतीच्या धोरणाचा भाग असून योजना बंद होणार नाही याचा विश्वास मिळत आहे.