संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरेकाठी येथे डिसेंबर महिन्यात शाळेतील विद्यार्थ्यांचे उपस्थिती वाढवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत जे विद्यार्थी सलग पंधरा दिवस हजर राहतात. प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थ्यांची लॉटरी द्वारे निवड करून त्याला लेखन साहित्य वही देण्यात येते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली.
तसेच आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निरव किरण कुमार वाकचौरे या विद्यार्थ्यांने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये एक चिकूचे झाड लावून पर्यावरण संरक्षण करण्यास हातभार देखील लावला . व निरव किरण कुमार वाकचौरे या विद्यार्थ्याने आज शपथ घेतली की मी रोज शाळेत आल्यानंतर या झाडाला पाणी देणार आहे आणि या झाडाला लोखंडी जाळी तयार करून लावणार आहे ह्या मुलाच्या संदेशामुळे शाळेतील सर्व मुलांनी ही संकल्पना राबवणार असल्याची घोषणा केली.
याप्रसंगी शाळेची मुख्याध्यापक विनोद उकिडेँ, सुनिता ओहोळ, प्रीती खालकर, कल्याणी साठे, सोमनाथ डोळे, अर्थवेद ॲग्रोटेक चे लक्ष्मण नरवडे यांनी शाळेतील झाडांसाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.