ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळणार नवी दिशा; ग्रामस्थांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार
पानोडी । झुंझार न्यूज
खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण मिळावे आणि शिकण्याची प्रक्रिया अधिक सोपी व रंजक व्हावी, या उद्देशाने राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पानोडी येथील जाधव वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ‘डिजिटल बोर्ड’ उपलब्ध करून देण्यात आला आहे. या डिजिटल बोर्डचा शुभारंभ मोठया उत्साहात संपन्न झाला.
ग्रामीण भागातील मुले तंत्रज्ञानात मागे पडू नयेत, यासाठी ना. विखे पाटील सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्याच या दूरदृष्टीतून जाधव वस्ती शाळेला हे आधुनिक शैक्षणिक साहित्य मिळाले आहे. या डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांना आता ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून धडे गिरवता येणार असून, शिक्षण अधिक प्रभावी होणार आहे.

यावेळी जनसेवा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब चव्हाण, माजी सरपंच राजू विठ्ठल जाधव, कारभारी तुकाराम चव्हाण, माजी उपसरपंच नाना पाटील शिंदे, अशोकराव तळेकर, रावसाहेब घुगे , ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन जाधव, वेणुनाथ पाबळ, पुंजा पाटील नागरे, नानाभाऊ कदम, बाळासाहेब कदम, पांडुरंग सांगळे, हौशाभाऊ भाऊ जाधव, राजू पाबळ, हरिभाऊ गपले, जनार्दन चव्हाण यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक डगळे, तसेच सहाय्यक शिक्षिका वंदना नजन , वर्षा दातीर यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. डिजिटल बोर्डमुळे मुलांना शिकवताना मोठी मदत होणार असून, विद्यार्थ्यांची प्रगती उंचावेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आणि शाळेच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते .

Post Views: 667



