माहिती तंत्रज्ञानाचा भारताचा जगात दबदबा – मा.आमदार डॉ.तांबे
तंत्रज्ञानातून मानवतावादी उपक्रम राबवावेत ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ – डॉ.क्रिस्तोफ फूमॅक्स
संगमनेर । झुंझार न्यूज
दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये नवनवीन बदल होत असताना या बदलाची माहिती विद्यार्थ्यांना होऊन नवीन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर व्हावा याकरता अमृतवाहिनी संस्थेमध्ये देश विदेशातील 20 शास्त्रज्ञांचे कुंभ 2025 या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून माहिती तंत्रज्ञानामुळे भारताचा जगात दबदबा असल्याचे मा. आमदार डॉ सुधीर तांबे यांनी म्हटले असून तंत्रज्ञानातून मानवतावादी उपक्रम राबावेत असे क्वीनलँड विद्यापीठ ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डॉ. क्रिस्तोफफूमॅक्स यांनी म्हटले आहे.
अमृतवाहिनी इंजिनीरिंग कॉलेजच्या इ अँड टी सी विभागामार्फत आयोजित टेक्निकल कुंभ 2025 या परिसंवादात ते बोलत होते. यामध्ये ऑस्ट्रेलिया येथील क्वीनलँड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ क्रिस्तोफ फूमॅक्स, ग्लोबल शेअरचे डॉ.अजय पोतदार, डॉ ब्रानिसलाव यम नाटोरस, डॉ युगो इस्पानोसा (ऑस्ट्रेलिया) प्रा जी.एस मनी ( पुणे) प्रा सतीश कुमार शर्मा सॅन दियागो,विद्यापीठ ,डॉ नरेशचंद ,(फोटो निक सोसायटी) डॉ. के.पी रे ( जेकेम) डॉ अजित कुमार सिंग आयआयटी पटना, सुरेंद्र प्राण पुणे ,डॉजावेद सिद्ध की (कॅनडा) डॉशुभम कौल (दिल्ली) डॉ राजश्री जैन पुणे ,डॉ.रवींद्र विशाल कुमार, भारती कुमारी,सत्यमणी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,प्राचार्य डॉ एम ए वेंकटेश, अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव विभाग प्रमुख डॉ.रेखा लबडे,यांसह जगभरातील विष शास्त्रज्ञ उपस्थित होते.
यावेळी बोलताना युनायटेड स्टेट येथील शास्त्रज्ञ डॉ ब्रानिसलाव नाटो रस म्हणाले की, दूरसंचार क्षेत्रातील रेडिओ आणि मायक्रो टेक तंत्रज्ञाने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अमलाग्र बदल केलेले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेस आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यामुळे मानवी जीवन स्तर उंचावण्यास मदत होईल.
तर डॉ.क्रिस्तोफ फूमॅक्स म्हणाले की, भारताची तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी झेप असून या तंत्रज्ञानाचा उपयोग मानवाच्या विकासासाठी झाला पाहिजे अमृतवाहिनी संस्था ही ग्रामीण भागात असूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर या संस्थेने मोठा नावलौकिक निर्माण केला असून विद्यार्थ्यांना या संस्थेमुळे करिअरची मोठी संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले.

तर माजी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी संस्थेमध्ये सातत्याने नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर व्हावा यासाठी परिसंवाद होत असून या आंतरराष्ट्रीय परिसंवादातून विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना मिळणार आहे.
तर प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाबाबतची माहिती दिली. यानंतर या सर्व शास्त्रज्ञाने बीजेपी सह्याद्री गुंजाळ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट ची पहाणी केली याचबरोबर वेल्हाळे येथील मूकबधिर विद्यालयाला सुद्धा भेट दिली. यावेळी समवेत डॉक्टर नामदेव गुंजाळ व मुख्याध्यापक चांगदेव खेमनर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉक्टर रेखा लबडे यांनी केली सूत्रसंचालन केतकी बंगाल व कृपा डावखर यांनी केले तर डॉ एस आर जोंधळे यांनी आभार मानले
Post Views: 559





