पाथरे । झुंझार न्यूज

 

 

 

लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरे बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे माननीय डॉक्टर खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचा पुण्यतिथी सप्ताहास सुरुवात झाली त्यामध्ये बाल आनंद मेळा हा उपक्रम साजरा करण्यात आला

यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे परिसराचा न भूतो न भविष्यती असा विकास झालेला आहे आपल्या ग्रामीण भागात शिक्षणाच्या विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत त्यांचा पुण्यतिथी सप्ताह निमित्त विद्यालयात बाल आनंद मेळा आयोजित करण्यात आला होता.

 

विद्यार्थ्यांना विक्री कौशल्य, ग्राहक संवाद कसा करावा, हिशोबाचे ज्ञान याची प्रत्यक्ष अनुभूती आली.
या आनंद बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील मेथी, वाल,कांद्याची पात, कांदे, कोबी, कडीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो,लसूण,कांदा, डांगर, गवतीचहा,गावरान अंडी इ विक्रीसाठी ठेवले होते.

 

प्रमुख आकर्षण ठरले खाऊ गल्ली यामध्ये पाणीपुरी, ओली भेळ, वडा, सोयाबीन चिल्ली, मसाला दूध, पोहे, मसाला डोसा, पॅटीस, इडली सांबर, साबुदाणा वडा, चणाचटपट, चहा, कॉफी इ खाद्यपदार्थावर विद्यार्थी पालक ग्रामस्थांनी ताव मारला खाऊ गल्ली कडे सर्वांचा ओढा जास्त दिसून आला. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आबासाहेब पा. घोलप हे होते. या कार्यक्रमास उपसभापती अण्णासाहेब कडू,सरपंच उमेश घोलप, संचालक शिवाजी घोलप,सुरेश घोलप, चित्राताई आंबरे,ताराचंद कडू, कारभारी .कडू,शरद गोरक्षनाथ घोलप, असलमभाई शेख,माजी सरपंच सोपान घोलप,माजी सरपंच हिरामण कदम, सोमनाथ डोळे ,प्राचार्य श्री. कोंडीबा बारगुजे, पर्यवेक्षक श्री अण्णासाहेब तांबे,ज्युनिअर कॉलेज इनचार्ज डॉ. संदीप म्हस्के प्राथमिकचे शाळाचे मुख्याध्यापक श्री घुगे यांचेसह शिक्षण प्रेमी ग्रामस्थ,शिक्षक -शिक्षिका,शिक्षकेतर सेवक वृंद उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. कोंडीबा बारगुजे यांनी तर सूत्रसंचालन श्री.राधाकृष्ण को-हाळे सर अनुमोदन प्रा. डॉ.संदीप म्हस्के यांनी तर आभार श्री.प्रसाद पलघडमल यांनी मांडले .

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *