संगमनेर । झुंझार न्यूज

 

भूतकाळ हा भविष्यकाळाचा मार्गदर्शक असून प्रत्येक नवीन दिवस आणि नवीन वर्ष नवी आशा, नवी ऊर्जा घेऊन येतो. त्याप्रमाणे येणारे नवीन वर्ष 2026 हे प्रत्येकासाठी आरोग्यदायी, आनंदाचे, सुख समृद्धीचे जाऊन नवीन वर्षात प्रत्येकाची संकल्पपूर्ती व्हावी अशा शुभेच्छा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूल व शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भूतकाळ हा प्रत्येकाचा मार्गदर्शक असून त्यावर भविष्याची वाटचाल ही ठरलेली असते. नवीन वर्षामध्ये प्रत्येकाला चांगले आरोग्याबरोबर चांगले जीवनमान मिळावे यासाठी सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. मागील वर्षात अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडल्या आहेत. वाईट गोष्टी परत घडणार नाही काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. आपले गाव शहर तालुका राज्य देश चांगला घडवण्यासाठी प्रत्येकाने एक चांगला संकल्प करावा.

Oplus_131072

सामाजिक बांधिलकी ठेवत संविधानाचा आणि लोकशाहीचा विचार जपत राष्ट्रहितासाठी काम करावे. मानवता हा धर्म सर्वात मोठा असून संत व समाज सुधारकांचे विचार घेऊन काम करावे. येणारे वर्ष 2026 हे सर्वांना आनंदाचे आणि संकल्पपूर्तीसह आनंददायी जावो अशा शुभेच्छा महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत.

Oplus_131072

2026 वर्षात सुदृढ व निरोगी समाज निर्मितीसाठी काम व्हावे – मा.आ.डॉ.तांबे

आगामी 2026 या नवीन वर्षात प्रत्येकाच्या हातून राष्ट्रहिताचे काम व्हावे. निरोगी समाज निर्मितीसाठी विज्ञाननिष्ठ विचार घेऊन युवकांनी समाजाच्या विकासासाठी काम करावे. या वर्षात प्रत्येक नागरिकास समृद्ध आरोग्य आनंदी जीवनाबरोबर नवीन वर्ष यशस्वी जावो आणि नवीन वर्षात प्रत्येकाने चांगला संकल्प करून सकारात्मक व पुरोगामी विचार वाढीस लावावा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

Oplus_131072

सकारात्मक कामातून प्रत्येकाच्या जीवनात आनंद  व्हावा – आमदार सत्यजित तांबे

महाराष्ट्राची संस्कृत परंपरा जपत प्रत्येकाने आपल्या जीवनातील यश मिळवण्यासाठी पूर्ण  कार्यक्षमतेने योगदान द्या. नवीन तंत्रज्ञानासह नवनिर्मितीवर भर देताना नवीन वर्ष 2026 मध्ये प्रत्येकाला चांगले आरोग्य व समाधान मिळावे अशा शुभेच्छा देताना सकारात्मक कामातून प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा असे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे

Oplus_131072

स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा- डॉ.जयश्रीताई थोरात

धावपळीच्या जीवनामुळे प्रत्येकाचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. मात्र येणाऱ्या वर्षांमध्ये प्रत्येकाला आनंदी जीवनासाठी आरोग्य समृद्धी लाभावी याचबरोबर लोकशाहीचा विचार घेऊन युवकांच्या हातून रचनात्मक कार्य उभे राहावे अशा अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी नवीन वर्षाच्या सर्वांना स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा अशा आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *