ग्रामीण समाजाची शाश्वत प्रगती करत असताना आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय गरजांचा समतोल साधत, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून, भविष्यातील पिढ्यांसाठी विकास साधण्याची कार्यप्रवणता अभ्यासूवृत्ती असणाऱ्या खा. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी जोपासली होती. शेती, सहकार, कृषी, लघुउद्योगामध्ये पर्यावरण पूरक तंत्रज्ञान वापरून खासदार साहेबांनी ग्रामीण भागाला स्वावलंबी बनवले, असे मत प्रतिपादन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक श्री. दत्ता पाटील शिरसाठ यांनी केले.
सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उत्सव समितीने आयोजित केलेल्या लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या नवव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात शिरसाठ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक ॲड. श्री. आप्पासाहेब दिघे , हे होते. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांनी केले. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य जे.पी. अण्णा जोर्वेकर, श्री. बाळासाहेब दिघे,., श्री. रमेश अण्णा पन्हाळे , श्री. कारभारी ताठे, श्री. दिलीप डुक्रे, श्री. सुभाष पाटील अंत्रे, वसंतराव पाटील, बलराज पाटील, उपस्थित होते.
याप्रसंगी एफ. वाय. बी. कॉम. या वर्गातील कु. कीर्ती गागरे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. शिरसाठ पुढे म्हणाले, “मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या बाळासाहेबांनी अनेक शैक्षणिक संस्था, विशेषतः ग्रामीण भागात उभ्या केल्या. शिक्षणामुळे माणूस जेवढा ज्ञानी बनतो तेवढा समाज सक्षम आणि विकसित होतो. विद्यार्थ्याला समाजाची व देशाची गरज भागवणारे व्यावसायिक शिक्षण मिळालं तरच देश सक्षम बनेल, असे दूरदृष्टी असणारे विचार ते ठामपणे मांडत होते.
महाविद्यालयाच्या उत्सव समितीचे समन्वयक प्रा. राहुल कडू यांनी आभार मानले. प्रा. दिप्ती आगरकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेअरमन प्रा. आर. बी. कडू , ग्रंथालय विभागाचे प्रमुख प्रा. आदिनाथ दरंदले, डॉ. एकनाथ निर्मळ, श्री. विकास दिघे, श्री. राजनाथ गोगडे, श्री. जयराम पर्वत यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.