आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

शास्तीकर माफीसाठी अभय योजना सुरू

संगमनेर । झुंझार न्यूज

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर विकासातून वैभवशाली ठरले आहे. नगरपालिकेने नागरिकांच्या सुविधांसाठी सातत्याने विविध योजना राबवले असून नगरपालिकेच्या थकीत मालमत्ता करामुळे नागरिकांवर शास्तीचा मोठा बोजा पडत असल्याने या शास्तीकरा वरील माफी मिळावी याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून संगमनेर नगरपालिकेत शास्ती अभय योजना सुरू झाली आहे.

Oplus_131072

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी नगरपरिषद नगरपालिका कार्यक्षेत्रातील थकीत मालमत्ता करा वरील शास्तीकर माफ करावा यासाठी अभय योजना लागू करावी ही मागणी केली होती. याबाबत विधान परिषदेमध्ये त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला. संगमनेर नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिक अनेकदा शास्ती कर भारतात. रक्कम घरपट्टीमध्ये धरली जात नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोठा अन्याय होतो. त्यामुळे हा अन्यायकारक शास्तीकर तातडीने रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली होती. याचबरोबर शास्ती कर योजनेला माफी मिळून अभय योजना लागू करावी याकरता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. तसेच या बाबत वेळोवेळी पत्र व्यवहार केला आणि विधान परिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन पावसाळी अधिवेशन  मध्ये आवाजही उठवला. 

Oplus_131072

या मागणीनुसार नगरपालिका नगरपरिषद कार्यक्षेत्रातील थकीत मालमत्ता कराबाबत आयडब्ल्यूबीपी योजनेतील त्रुटी दूर करून अभय योजना लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत संगमनेर नगरपालिकेत सुमारे 2 कोटींची शास्ती करमाफी केली जाणार असून नागरिकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.

Oplus_131072

नगरपालिका कार्यक्षेत्रातील अनाधिकृत बांधकामांवर वर्षानुवर्ष थकीत कर वाढल्याने याचा मोठा भार नागरिकांवर पडत होता. त्यामुळे हा कर कमी करावा याकरता केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून तांत्रिक अडचणी दूर करत नगरपालिका कार्यक्षेत्रासाठी अभय योजना लागू झाल्याने अनेक नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Oplus_131072

 या योजनेचा संगमनेर शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले असून संगमनेर नगर परिषद ही संगमनेर मधील सर्व नागरिकांना चांगल्या सुविधा बरोबर सर्व लाभ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed