संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार व भव्य शेतकरी मेळावा महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीमध्ये पिंपरने येथे रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वा. आयोजित करण्यात आले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष अजय फटांगरे व युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी सायंकाळी 6 वाजता पिंपरने येथे भव्य शेतकरी मेळावा होणार असून या मेळाव्यासाठी ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर, डॉ. जयश्रीताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, ॲड माधवराव कानवडे, गणपतराव सांगळे, शरद नाना थोरात, रणजितसिंह देशमुख, यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रिपब्लिकन पार्टी पुरोगामी व मित्र पक्षांच्या संघटना व विविध पक्षांचे पदाधिकारी, तसेच शेतकरी नेते व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पिंपरने व पंचक्रोशीच्या वतीने संगमनेर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे व सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तरी या शेतकरी मेळाव्यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिक बंधू महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी व शरद नाना थोरात मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


