झरेकाठी । झुंझार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांच्या विविध उपकरणातून अनेक योजना राबवत असतो श्रीमती सिंधुताई एकनाथराव विखे पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग लोणी प्रवरा यांच्या उपक्रमातून राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस कॅम्प अंतर्गत झरेकाठी या गावामध्ये ( आरोग्य शिबिर ) मेडिकल कॅम्प घेण्यात आला कॅम्प मध्ये विविध आजारांचे निदान करून योग्य ते मोफत उपचार करण्यात आले

 

या शिबिरामध्ये वैद्यकीय विभाग कान नाक घसा विभाग अस्थिरोग विभाग डोळ्यांचे आजार व दातांचे विकार यावर उपचार करण्यात आले या उपक्रमासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस .पी जगदाळे , प्राचार्य श्री डॉ. राजेंद्र लामखडे तसेच एन एस एस कॉर्डिनेटर श्री प्रसाद तांबे व सहकारी शिक्षक श्री दादासाहेब जेऊघाले , श्री अंकित निबे, कॉलेजचे ऐ वो श्री विजय आहेर ,वैद्यकीय विभागाचे सर्व डॉ. नूतन कहार, डॉ
प्रज्वल झोरे, इ एन टी विभागाचे डॉ. पटेल, दंत विभागाचे डॉ. प्राची गडाख, डॉ. यशोधन अस्थिरोग तज्ञ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व विद्यार्थी व झरेकाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा हेल्थ चेक अप करण्यात आला तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी केली 250 हून अधिक रुग्णांनी तपासणी करून घेतली या कार्यक्रमासाठी झरेकाठी गावचे सरपंच तसेच सर्व सदस्य व ग्रामस्थ झरेकाठी यांचे हा कार्यक्रम घेण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या वतीने सर्वांचे मनापासून आभार!

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *