तांभेरे । झुंझार न्यूज

 

 

डॉ. सुस्मिताताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारा विशेष उपक्रम उद्या गुरुवार, दि. ०८ जानेवारी २०२६ रोजी तांभेरे येथे आयोजित करण्यात आला आहे. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ यांच्या अंतर्गत तांभेरे येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) शिबिर २०२५–२६ अंतर्गत १५१ आंबा रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.

 

हा उपक्रम लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पर्यावरणपूरक विचारांची प्रेरणा घेऊन राबविण्यात येत असून, ग्रामीण भागात हरित संस्कृती रुजविणे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमात शालिनीताई विखे पाटील,माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्या शुभहस्ते आंबा रोपांचे महाविद्यालयाला वाटप होणार आहे. यावेळी मान्यवर वृक्षलागवड व संवर्धनाचे महत्त्व, विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी तसेच शाश्वत विकासासाठी युवकांची भूमिका यावर मार्गदर्शन करणार आहेत.


या कार्यक्रमाचे आयोजन श्री. बलराज वसंतराव पाटील, अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ, सात्रळ महाविद्यालय यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. 

तांभेरे येथे होणाऱ्या या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राचार्य सोपान शिंगोटे, विलास पाटील मुसमाडे उत्तमराव मुसमाडे,सरपंच उमेश मुसमाडे, भाजपा बूथ प्रमुख सोमनाथ डोळे, माजी सभापती भिमराज हारदे, चंद्रकांत पवार , काकासाहेब ढगे, लक्ष्मण गागरे, नंदकिशोर मुसमाडे, मेजर ताराचंद गागरे बाळासाहेब बेलकर, सुनील गागरे, पंढरीनाथ शेलार, बाळासाहेब मुसमाडे, जालिंदर बेलकर, रामदास गागरे, विनोद महाराज मुसमाडे, आदित्य डेरे, सोपान शेलार, बाळासाहेब बेलकर, भीमराज बेलकर, बाळासाहेब मुसमाडे, सागर मुसमाडे ग्रामपंचायत सदस्य, सुषमा मुसमाडे ग्रामपंचायत सदस्य, पुनम शेलार
ग्रामपंचायत सदस्य, किशोर तांबे सदस्य, कल्पना हुडे., सुजाना मुसमाडे, लक्ष्मीबाई मुसमाडे, सविता शेलार,येथील प्राध्यापकवर्ग, NSS स्वयंसेवक, माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


या उपक्रमात रोपवाटपाबरोबरच रोपांचे संगोपन करण्याची शपथ घेण्यात येणार असून, पर्यावरण रक्षणाबाबत दीर्घकालीन जनजागृती घडवून आणण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *