आश्वी । झुंझार न्यूज

 

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जिल्हास्तरीय भव्य ललित कला स्पर्धा २०२५’ मध्ये प्रवरा माध्यमिक विद्यालय, उंबरी बाळापूरची विद्यार्थिनी कुमारी समीक्षा भागवत भुसाळ हिने चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील हस्ताक्षर स्पर्धेत समीक्षाने संगमनेर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.


या यशाबद्दल समीक्षाचा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) यांनी स्थापन केलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना नेहमीच वाव दिला जातो. याच परंपरेचा वारसा जपत समीक्षाने आपल्या सुंदर हस्ताक्षराच्या जोरावर तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.

या गौरव सोहळ्याप्रसंगी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. सुष्मिताताई विखे पाटील, शिक्षण संचालिका सौ. सरोदे मॅडम, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रसाळ सर आणि समीक्षाला मार्गदर्शन करणाऱ्या कला शिक्षिका बोंद्रे मॅडम उपस्थित होत्या. मान्यवरांनी समीक्षाच्या यशाचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

समीक्षाच्या या यशामुळे उंबरी बाळापूर परिसरात आनंदाचे वातावरण आहे. विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने समीक्षाचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे जिल्हा व तालुका स्तरावर यश संपादन केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *