जिल्हा परिषदेची कार्यप्रणाली आणि राष्ट्रीय सेवा योजनाची शिबिर ही परस्पर पूरक कार्य करत असतात. ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमध्ये समाजसेवेचा कार्यकारण भाव रूजविला जातो. ‘सेवेद्वारे शिक्षण’ हे ब्रीदवाक्य घेऊन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करून समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व तयार केले जाते. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक जिल्हा परिषदेच्या अनेक कल्याणकारी योजनांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सदरची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून प्रत्यक्ष ग्रामीण विकास कार्याला हातभार लावतात. खरे तर श्रमसंस्कार शिबिर म्हणजे सुसंस्काराची पाठशाळा असते, असे मत प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मा. सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
‘शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन’ हे मध्यवर्ती आशयसूत्र घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या तांभेरे येथील विशेष श्रमसंस्कार शिबिर समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शालिनीताई विखे पाटील ह्या मार्गदर्शन करत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तांभेरे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष. उत्तमराव मुसमाडे होते.
यावेळी सात्रळ महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. . बाळकृष्ण चोरमुंगे , संस्थेचे संचालक ॲड. श्री. आप्पासाहेब दिघे , सदस्य . जे. पी. अण्णा जोर्वेकर, रमेश पन्हाळे, सुभाषराव अंत्रे , माजी उपसभापती मंदाताई वसंतराव पाटील ,योगेश पा.चोरमुंगे, चंद्रकांत पवार, काकासाहेब ढगे, बाळासाहेब मुसमाडे, बाळासाहेब बेलकर, नंदकिशोर मुसमाडे , पंढरीनाथ शेलार, लक्ष्मण गागरे, रेवजी मुसमाडे, ज्ञानदेव बेलकर, सागर मुसमाडे, अमोल हारदे, शिवाहारदे,राजेंद्र चोरमुंगे, कानडगावचे सरपंच निशा गागरे, तांभेरे गावचे माजी सैनिक मेजर श्री. ताराचंद गागरे, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब बेलकर, कानडगाव ग्रामपंचायत माजी सरपंच मधुकर गागरे, काडगाव सेवा सोसायटी माजी अध्यक्ष सोपानराव गागरे, श्रीराम जन्मोत्सव समितीचे मा. अध्यक्ष श्री. विलासराव मुसमाडे, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील गागरे, रवींद्र कांबळे, सागर मुसमाडे, सात्रळ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष . बलराज वसंतराव पाटील,. संतोष उबाळे, पत्रकार . सोमनाथ डोळे, माजी मुख्याध्यापक डॉ. अनिल लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश सरोदे, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, प्रो. डॉ. रामदास बोरसे, तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांनी पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने श्री. विलास मुसमाडे व स्वयंसेवक कु. अक्षदा शिंदे, चि. रोशन वाणी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप राजभोज यांनी सात दिवसांच्या श्रमसंस्कार शिबिराचा सविस्तर अहवाल सादर केला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे बोधचिन्ह, अहमदनगर जिल्ह्याची सामाजिक व सांस्कृतिक ओळख यासंदर्भात स्वयंसेवकांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधत सर्वांना अंतर्मुख केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधत असताना सभोवतालचे पर्यावरण, वर्तमानकालीन बदलती परिस्थिती आणि सामान्य ज्ञान यांची सांगड शिक्षकांनी घालावी यासंदर्भात सूचना केल्या. याप्रसंगी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सात्रळ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. बलराज वसंतराव पाटील यांच्या सहकार्याने १५१ आंब्याच्या रोपट्याचे वाटप सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या व मान्यवरांच्या शुभहस्ते स्वयंसेवकांना करण्यात आले.
शिबिर समारंभाचे आभार रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विजयकुमार शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, प्रा. दीप्ती आगरकर यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रतिभा विखे, श्री. आदिनाथ माघाडे, १२५ शिबिरार्थी स्वयंसेवक, प्राध्यापक व कर्मचारी, ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.