प्रवरा माध्यमिक विद्यालय रामपूर , तालुका राहुरी या विद्यालयात अंकनाद परीक्षेत विद्यार्थीनी कु. जानवी योगेश जाधव हिने राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रु.11000 /- व कु. ईश्वरी सुनील बेलकर हिने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रु.7000/- या विद्यार्थीनींनी पटकावून यश संपादन केले आहे.
त्या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय डॉ.श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा माननीय सौ. शालिनीताई विखे पाटील मा. खासदार माननीय सुजय दादा विखे पाटील, संस्थेच्या सीईओ सन्माननीय सुष्मिता विखे पाटील, संस्थेच्या संचालिका सौ.लीलावती सरोदे मॅडम, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री.राहुल पाटील साबळे, स्था स्कूल कमिटी उपाध्यक्ष व रामपूर सोसायटी मा. अध्यक्ष श्री ज्ञानदेव पा लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते बलराज पाटील, विविध कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष श्री. भाऊसाहेब पा पठारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र साबळे, राज्य आदर्श शिक्षक व माजी मुख्याध्यापक डॉ.अनिल लोखंडे , श्री. राजेंद्र पा खळदकर,श्री. सुभाष पा पठारे यांनी व सर्व पालक ,ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक श्री संपत कुटे व सर्व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.