लोकनेते बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित )प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था प्रवरानगर व प्रवरा कला अध्यापक संघ आयोजित पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या भव्य जिल्हास्तरीय ललित कला स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:00 वाजता गंगुबाई इंडोर स्टेडियम प्रवरा कन्या विद्यामंदिर लोणी येथे पार पडला
या पारितोषिक वितरण समारंभासाठी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील व संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सुष्मिताताई विखे पाटील व संस्थेच्या संचालिका( माध्यमिक विभाग) सौ. लिलावती सरोदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण पार पडले या पारितोषिक वितरणामध्ये प्रवरा माध्यमिक विद्यालय,झरेकाठी येथील ८ वी ते १० वी या गटात चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी कु.पूजा शरद वाणी तसेच ५ वी ते ७ वी या गटामध्ये हस्ताक्षर स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक कु.समृद्धी अमोल हारदे व तालुक्यामधून चित्रकला स्पर्धेत ८वी ते १०वी गटामध्ये प्रथम क्रमांक चि. यश गंगाधर वाणी ५ वी ते ७ वी गटामध्ये चित्रकलेमध्ये प्रथम क्रमांक कु.साईशा सुनील वाणी या विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले
या विद्यार्थ्यांना विद्यालयातील कलाशिक्षक श्री.मनोज पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे शालेय स्कूल कमिटी अध्यक्ष ॲड पोपटराव वाणी , .गोकुळ वाणी , शिवाजी वाकचौरे, प्राध्यापक विलास वाणी, भिकाजी वाणी, पोपटराव आनंदराव पाटील, , प्राध्यापक रामचंद्र डोळे, उद्योगपती लक्ष्मणराव डोळे, सोमनाथ नाईकवाडी, बाळासाहेब डोळे,मधुकर वाणी, .सुदामराव वाणी,सोमनाथ डोळे, गोरख वाणी, मुख्याध्यापक प्रभाकर सांगळे व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.