7 फेब्रुवारी 2023 रोजी पथदिवे हाय मॅक्स साठी 2 कोटींची मंजुरी

संगमनेर । झुंझार न्यूज

रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द या रस्त्याच्या चौपदरीकरण कामाबरोबर या रस्त्याचे विद्युतीकरण,पादचारी मार्ग,युटीलिटी स्थलांतर या कामासाठी मा.महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 7 फेब्रुवारी 2023 रोजीच या कामाची मंजुरी मिळवली असून नवीन लोकप्रतिनिधी यांचा या कामाशी कोणताही संबंध नसून ते खोट्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप संगमनेर खुर्द चे उपसरपंच गणेश शिंदे यांनी केला आहे.

गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीत व प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व कमी व्हावी याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी नऊ किलोमीटरचा बायपास मंजूर करून घेतला. याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज ते बस स्थानक आणि पुढे संगमनेर खुर्द ते रायतेवाडी फाटा हा चौपदरीकरण हॅपी हायवे मंजूर केला. बस स्थानकापर्यंतचे कामही पूर्ण झाले आणि त्यानंतर रायतेवाडी फाटा ते प्रवरा नदी इथपर्यंतचे कामही चौपदरीकरणाचे पूर्ण झाले. यानंतर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे 7 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय महामार्ग 60 ते संगमनेर खुर्द या रस्त्या करता पादचारी मार्ग युटीलिटी स्थलांतर व पथदिवे बसवणे कामासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.

यानंतर लोकनेते थोरात यांच्या मागणीवरून या कामाची मंजुरी झाली असून आता हे काम होणार आहे. याबाबत कार्यकारी अभियंता विद्युत विभागाकडून 6 मार्च 2024 रोजी निविदा उघडण्यात आली तर 13 मार्च 2024 रोजी हे काम संबंधित व्यक्तींकडे सोपवण्यात आले. याचे पत्रही ग्रामपंचायतला प्राप्त झाले आहे.

या मागणीसाठी संगमनेर खु.ग्रामपंचायत यांच्याकडील पत्र ही थोरात साहेब आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले आहे. ही वस्तुस्थिती असताना नवीन लोकप्रतिनिधी यांचा या कामाशी कोणताही संबंध नाही. त्यांनी कोणताही नवीन निधी मिळवला नाही. परंतु विद्यमान सरकार सत्तेत असल्याने थोडीफार माहिती मिळताच बातमी देऊन ते जनतेची दिशाभूल करत आहे. खरे तर त्यांनी नवीन कामाकरिता निधी मिळवला पाहिजे. मात्र ते तसे करत नाही अद्याप त्यांना तालुक्यामध्ये एक रुपया सुद्धा निधी आणता आला नाही. संगमनेर खुर्द गाव आणि रायतेवाडी फाटा ते संगमनेर या विद्युतीकरण कामांमध्ये त्यांचे कोणतेही योगदान नाही. या रस्त्यावर पथदिवे बसवणे आणि रस्ता प्रकाशमय करणे यासाठी 2023 मध्येच लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मागणी करून निधी मंजूर करून घेतला आहे.

त्यामुळे नवीन लोकप्रतिनिधी यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारणे चांगले नसून खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करू नये असेही उपसरपंच गणेश शिंदे यांनी म्हटले असून चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल केल्याने संगमनेर शहरातून जनतेने त्यांना धडा शिकवला आहे. यापुढील काळामध्ये अशा कोणत्याही खोट्या बातम्या देऊ नये अन्यथा गाव बंदी करू असा  इशाराही गणेश शिंदे यांच्यासह संगमनेर खुर्द मधील ग्रामस्थांनी दिला आहे.

निधी आणा आणि मग श्रेय घ्या, माजी मंत्री थोरात यांच्या कामांचे श्रेय घेऊ नका – नागरिक

महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर तिजोरी मध्ये खणखळाट आहे. कोणत्याही नवीन कामांना पैसे मिळत नाही. फक्त पत्रक बाजी देऊन दिशाभूल केली जात आहे. वस्तुस्थितीमध्ये एकही नवीन काम सुरू नाही. हे तालुक्यातील जनतेला माहिती आहे. कामे जी सुरू आहे ती सर्व लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आपले कार्यकाळात मंजूर करून घेतली आहे. तीच कामे सध्या सुरू आहे. त्यामुळे रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द या रस्त्यामध्ये कोणतेही योगदान नसलेल्या नवीन लोकप्रतिनिधीने श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये असेही सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी म्हटले आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *