अश्विन महाविद्यालय व आयुर्वेद हॉस्पिटलचा उपक्रम

 

 

तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार रुग्णांची तपासणी

आश्वी । झुंझार न्यूज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एकलव्य आ.भ.वि.जा.ज. व मा.से. संस्था संचलित अश्विन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (मांचीहिल, आश्वी बु।।) यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन हजारवाडी (ता. संगमनेर) येथे करण्यात आले आहे. या शिबिराचे औचित्य साधून अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सहकार्याने गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी भव्य ‘मोफत सर्वरोग निदान व तपासणी शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात विविध क्षेत्रातील निष्णात डॉक्टर आपली सेवा देणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील तज्ज्ञांचा समावेश असेल:

डॉ. अविनाश जाधव: केसांचे विकार, त्वचारोग, दमा, अस्थमा व पांढरे कोड तज्ज्ञ.
डॉ. शिवपाल खंडीझोड: मुत्रविकार, किडणी, मुळव्याध व भगंदर तज्ज्ञ.
डॉ. राजन कुलकर्णी: जुनाट सर्दी, सांधेदुखी, पोटाचे विकार व मधुमेह तज्ज्ञ.
डॉ. ज्योती खंदारे: पोटाचे आजार, सांधेदुखी व स्त्रीरोग तज्ज्ञ.
डॉ. तेजस्विनी मोरे: मोतीबिंदू, काचबिंदू व डोळ्यांचे सर्व विकार तज्ज्ञ.
डॉ. अंबादास काळुखे (पंचकर्म तज्ज्ञ) व डॉ. शुकाचार्य वाघमोडे हे देखील रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांची प्राथमिक तपासणी पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. तसेच रुग्णांना लागणारी औषधे आणि इतर वैद्यकीय कर्म (उपचार) अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून दिले जातील. ज्या रुग्णांना पुढील उपचारांची किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, त्यांना अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून सवलतीच्या दरात उपचार दिले जाणार आहेत.

संस्थेचे संचालक दत्ता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. मोहन मोरे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्र हिंगे आणि प्रा. सौ. स्नेहल आव्हाड हे या शिबिराचे नेटके नियोजन करत आहेत. हजारवाडी आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *