संगमनेर । झुंझार न्यूज
नवीन लोकप्रतिनिधीचा कट्टर समर्थक अशी बिरूदावली मिरवून स्वतःची लायकी नसताना सातत्याने कोणावरही अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या दिनेश फटांगरे या विकृत माणसाला तात्काळ अटक करावी अशी मागणी संगमनेर तालुका काँग्रेस सह संगमनेर तालुक्यातील तरुणांनी केली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्यावरही टीका केल्याने संगमनेर तालुक्यातून मोठी संतापाची लाट उठली होती.
याबाबत संगमनेर तालुक्यातील तरुणांनी संगमनेर पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे की, दिनेश फटांगरे या विकृत व विध्वंसक प्रवृत्तीने सातत्याने चांगल्या गोष्टींना विरोध केला आहे. सध्याचे नवीन लोकप्रतिनिधी यांचा कट्टर समर्थक म्हणून बिरूदावली मिरवताना त्याने शिंदे शिवसेना शहर प्रमुख म्हणून तालुक्यात दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनावरही धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. या विकृत माणसाने राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आणि यानंतर मात्र संगमनेर तालुका पेटला. शिंदे शिंदे फटांगरेला तात्काळ पदावरून हटवण्याची दाखवण्यासाठी कार्यवाही केली मात्र हे जनतेला रुचली नाही यानंतर फटांगरेने पुन्हा उन्माद सुरूच ठेवला आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यावरही टीका केली.
यानंतर सर्व तरुणांनी एकत्र येत दिनेश फटांगरे याला अटक करावी अशी मागणी पोलीस स्टेशन समोर केली. या निवेदनात म्हटले आहे की, फटांगरे हा सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून खालच्या पातळीवर टीका करत असतो. व्यक्तिगत आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे टीका करताना प्रशासन मात्र त्याच्यावर काहीही कार्यवाही करत नाही यामुळे समाजातील शांतता धोक्यात आली असून अशा वाईट प्रवृत्तीला तात्काळ अटक करावी अशी मागणी तरुणांनी केली आहे.
यावेळी निखिल पापडेजा, शिवसेनेचे अमर कतारी, नगरसेवक नितीन अभंग, शैलेश कलंत्री, डॉक्टर दानिश खान, किशोर टोकसे, दत्ता कोकणे,गणेश मादास, शुभम परदेशी, विनायक गरुडकर, डॉ.सातपुते, बाळासाहेब पवार, अमित गुंजाळ,जावेद पठाण,प्रथमेश गरुडकर,संतोष मांडेकर,अंबादास आडेप,किशोर बोऱ्हाडे,संदीप लोहे, सुहास आहेर, गजेंद्र अभंग, गणेश गुंजाळ,सौरभ कासार, संजय पगडाळ, अंकुश ताजने,विजय पांढरे, सुमित पवार, संकेत कोकणे,सागर कानकाटे, शुभम परदेशी, अमजद शेख यांच्यासह तालुक्यातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते. हे निवेदन सर्व युवकांनी पोलीस निरीक्षक बारवकर व पोलीस उपविभागीय अधिकारी सोनवणे यांना दिले आहे.

याचबरोबर तात्काळ कार्यवाही न झाल्यास संगमनेर शहर बंद सह रास्ता रोको करण्याचा इशारा संगमनेर मधील तरुणांनी दिला आहे.


