संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

 

ग्रामीण भागात रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानून काम करत असताना अवघ्या सहा महिन्यांमध्ये संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी अजमपुर गावामध्ये रुग्णांना अतिशय तत्पर व चांगली सेवा दिल्यामुळे प्रवरा मेडिकल ट्रस्ट चा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिला जाणारा उत्कृष्ट मानांकन हा मानाचा पुरस्कार प्रवरा ग्रामीण रुग्णालय पिंपरी लौकी अजमपुर या गावातील रुग्णालयाला चेअरमन राजेंद्र पाटील विखे यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आहेर मॅडम यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद यांना बहाल करण्यात आला

 

ग्रामीण भागात रुग्णालयाची नितांत गरज लक्षात घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र विखे पाटील यांच्या प्रेरणेने अवघ्या सहा महिन्यापूर्वी पिंपरी लोकी अजमपुर या गावांमध्ये या आरोग्य केंद्राची सुरुवात झाली व रोज 50 ते 60 रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करून रुग्णांना मोठा दिलासा दिला रुग्णांना अस्तावैक चौकशी करून विविध आजारावर जागेवरच औषध उपचार करून गरीब गरजू रुग्णांना मोठा फायदा झाला तसेच गावातील व परिसरातील अत्यवस्थ रुग्णाना ॲम्बुलन्स द्वारे प्रवरा मेडिकल ट्रस्ट येथे पाठवून त्यांनाही योग्य असा औषधोपचार केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहे

या रुग्णालयामार्फत विविध आजारावर माफक दरामध्ये उपचार केले जातात त्यामुळे या गावासह गावाशेजारील खळी पानोडी कांगणवाडी खर शिंदे वर शिंदे कनशेवाडी येथील रुग्णांनाही फायदा होत आहे या रुग्णालयामार्फत साठ वर्ष पुढील वृद्धांना मोफत उपचारासाठी दर सोमवारी मोफत गाडी द्वारे प्रवरा मेडिकल ट्रस्ट मध्ये भरती करून विविध आजारांवरील चाचण्या करून त्यांना मोफत उपचार देण्यासाठी दर सोमवारी दहा ते पंधरा रुग्णांना पाठवले जाते या गावातील वैद्यकीय सेवेचा व रुग्णांचा मिळणारा प्रतिसाद भक ता व रुग्णसेवेचा अतिशय सुंदर असा केलेल्या कामाचा आढावा घेऊन प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पाटील विखे यांनी या रुग्णालयाला यावर्षीचा उत्कृष्ट कामाचा मानांकन दिल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना शाबासकी दिली भविष्य काळात या गावांमध्ये मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून दंत रुग्ण बाह्य रुग्णविभाग मेडिसिन इत्यादी विभाग चालू करून अधिक अधिक उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला

 

या रुग्णालयाला मिळालेला पुरस्कार निश्चितपणे या गावाचा विकासात्मक रुग्णसेवेचा अभिमान आहे

 

पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील सौ शालिनीताई विखे पाटील खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त ध्रुवविखे पाटील सामाजिक कार्यकर्ते व जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारतराव गिते सरपंच सौ संगिता गिते उपसरपंच बाजीराव गिते ग्रामपंचायत सदस्य अनिल गीते दौलत दातीर चांगदेव कदम विकास दातीर सौ चित्रा गीते मनीषा गीते संगीता गीते लक्ष्मीबाई दातीर उज्वला दातीर ग्रामसेवक भरत सोनवणे सह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे .

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *