नांदुरी दुमाला विद्यालयाचा अभिमान; ट्रॉफी व ब्राँझ पदकाने गौरव
नांदुरी दुमाला । झुंझार न्यूज
सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय, नांदुरी दुमाला येथील विद्यार्थिनी कु. शेळके वैष्णवी मिनानाथ हिने गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षा 2025 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे तिला प्रशस्तिपत्र, ट्रॉफी आणि ब्राँझ पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
देशभरातील शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर ही परीक्षा घेतली जाते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याची ओळख, त्यांच्या मूल्यांची जाणीव आणि संस्कारांची जपणूक व्हावी या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन केले जाते. डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या या परीक्षेत विद्यालयातील 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत नैपुण्य प्राप्त केले.
या यशाबद्दल कु. वैष्णवी हिला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. किशोर शिंदे सर यांचेही विशेष कौतुक होत आहे.
या यशस्वी विद्यार्थिनीचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, संस्थेचे चेअरमन व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सचिव श्री. सुमंत कोल्हे, संचालक प्रा. बाबा खरात, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष श्री. साहेबराव (तात्या) कवडे, राजहंस दूध संघाचे संचालक श्री. विलासशेठ कवडे, तसेच विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. प्रमोद देशमुख सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.