ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संकलित केले ‘लोकसाहित्य’
झरेकाठी । झुंझार न्यूज
सात्रळ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि सध्या श्रीरामपूर येथील वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विषय अध्यापनाचे कार्य करणारे प्रा. प्रकाश दत्तात्रय साबळे मार्गदर्शन करताना म्हणाले की,”मला एक पालक भेटले होते ते म्हणाले की, माझा मुलगा मॉलमध्ये शिक्षण घेतोय. तिथे सगळं काही विकत मिळतं. वह्या, पुस्तके, पेन, युनिफॉर्म, बूट व टाय. पण माणुसकीला केलय बाय-बाय. शिक्षणाचे बाजारीकरण होतंय, ही खंत व्यक्त करतोय निंभेरे गावचा मराठी माध्यमातून शिकलेला उच्चविद्याविभूषित तरुण प्राध्यापक प्रकाश साबळे.
लोकसाहित्याचे हस्तलिखित भित्तीपत्रक उद्घाटन झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक व मराठी विभागप्रमुख डॉ. नवनाथ शिंदे यांनी केले. प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे, कला शाखाप्रमुख डॉ. भाऊसाहेब नवले, प्रो. (डॉ.) अनंत केदारे, डॉ. सुषमा उंडे, डॉ. विजय शिंदे, डॉ. एकनाथ निर्मळ, प्रा. संदीप राजभोज, प्रा. राहुल कडू, प्रा. राजदेव उपस्थित होते.
औक्षण करून विचारपीठावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला उभा राहिलेला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी जुन्या आठवणी सांगत होता. आपली यशोगाथा सांगताना प्रा. साबळे म्हणाले,”आमचा भूतकाळ खूप संघर्षमय होता. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा शैक्षणिक संकुलात अनेक भौतिक सुविधा उभ्या केल्या आहेत. येथील विद्यार्थी कार्यक्रम संयोजन कौशल्य आणि सादरीकरण उत्कृष्ट करत आहेत. मातृभाषा ही आपल्या जवळची व जिव्हाळ्याची बोलीभाषा असते. अभिजात मराठी आता सातासमुद्रपल्याड पोहचली आहे. रोजगाराच्या अनेक संधी भाषाक्षेत्रात उपलब्ध झालेल्या आहेत. प्राचीन मराठी शिलालेख, ग्रंथसंपदा ते राजभाषा असा मराठीचा मंगल प्रवास त्यांनी सोदाहरण उलगडून दाखवला.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूजा व आरती बाबासाहेब शिंदे यांनी केले. आभार डॉ. गंगाराम वडीतके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘साहित्योत्सव’ भित्तिपत्रिकाच्या अध्यक्षा कु. सुप्रिया सुनिल पलघडमल, रोहिणी भिवा चितळकर, भाग्यश्री राजेंद्र सजन, अक्षदा चांगदेव घोरपडे, प्रिया अशोक बलमे या विद्यार्थ्यांनी खूप खूप परिश्रम घेतले.