संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे आज दिनांक 10/03/2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त (तिथीप्रमाणे) दुपारी 5.00 वा. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा व शिवज्योत यांची भव्य मिरवणूक होणार असून सायंकाळी 7.00 वा. शिवश्री रविंद्र आगलावे महाराज यांचे शिवकिर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती एकता युवा मंच कमिटीनी दिली . युवकांनी गुरुवारी ९ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्लावर जावून तेथून निनवाणी पायी शिवज्योत आणली असून दुपारी ४ वाजेपर्यत लोकांच्या दर्शनाकरिता ठेवण्यात आली होती . तरी शिवज्योत मिरवणुक व शिवकिर्तनात सहभागी होवून सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन एकत युवा मंचानी केल आहे .
