संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील अत्यंत महत्त्वाची संस्था असलेल्या ‘विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी’च्या चेअरमनपदी अशोक नारायण वालझाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही सोसायटी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील विखे गटाच्या ताब्यात असून, या निवडीमुळे विखे गटाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
सोसायटीच्या नूतन अध्यक्षांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जोशी यांनी कामकाज पाहिले. चेअरमन पदासाठी अशोक नारायण वालझाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. वालझाडे यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत असणार आहे.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य तबाजी मुन्तोंडे, अण्णासाहेब म्हस्के, शिवाजी डोंगरे , संरपच प्रमोंद बोंद्रे , प्रकाश शिंदे यांसह गावातील प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक दशकांपासून ही संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत आहे. माजी चेअरमन भिमा बोंद्रे , व्हाचेअरमन विठ्ठल मुन्तोडे , संचालक शिवाजी डोंगरे , बाबासाहेब म्हस्के , युनुस शेख , राजेंद्र मांढरे, शिवराम बोंद्रे, नंदू रक्टे , दिलावर शेख , लक्ष्मीबाई चांगदेव नागरे , विमल बोंद्रे , संजय मुन्तोडे , शिवाजी नागरे आदी संचालक उपस्थित होते .
नूतन चेअरमन अशोक वालझाडे यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले की, “विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व संचालकांच्या सोबतीने सोसायटीचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालवला जाईल. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याला माझे प्रथम प्राधान्य राहील.