झरेकाठी । झुंझार न्यूज

 

कोल्हार खुर्द येथील ग्रामदैवत श्री विरभद्र (बिरोबा) महाराज यात्रेच्या निमित्ताने कुस्ती चा आंगामा नामांकित पैलवान यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडला हिंदू नववर्ष गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर साला बाद प्रमाने यात्रेची सुरुवात झाली पुणतांबा येथुन पवित्र गंगेच्या पाण्याने कावडी द्वारे पाडव्याच्या दिवशी सकाळी बिरोबा महाराजांना अंघोळ घालून पुजन करण्यात आले सायंकाळी डफ वाद्यांच्या तालावर काठीची मिरवणूक होऊन गावातील प्रत्येक घरासमोर काठी चे पुजन करण्यात आले त्या नंतर काठी मिरवुण मंदीराचे समोर आले वर त्या ठिकाणी पुरातन काळापासून चालत आलेली परंपरा भकत्ता कडुन वहीक सांगण्यात येते म्हणजे वर्षे भराचे भविष्य वर्तवले जाते वहीक सांगण्यात आले त्या नंतर त्याच ठिकाणी वाघ्या मुरळीचा जागरणाचा कार्यक्रम पार पडला

पुरातन काळापासून चालत आलेली परंपरा म्हणजे दस अवतारी खेळ सोगांची आखाडी रामायणातील संपूर्ण रामायण कथा जिवंत देखावे संबळ सनयी ताफा या वाद्यांच्या तालावर नाचविण्यात येतात तेही रात्र भर आणि दिवस उजाडतो त्या वेळी सकाळी देवीच्या मुखवट्या ची आरती होऊन कार्यक्रम यथोचित पार पडतो दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४वाजता सालाबादप्रमाणे कुस्ती आखाड्याला नारळ वाढवून सुरूवात झाली बाहेर गावाहून आलेल्या पैलवानांच्या कुस्ती शांततेत पार पडल्या आलेल्या पैलवानांना योग्य मानधन देऊन सन्मानित करण्यात आले

त्यासाठी संपुर्ण यात्रेचे नियोजन गावाचे सरपंच श्री दिगंबर सर पाटील शिरसाठ पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव सिरसाठ , बाळासाहेब श्रीमंत शिरसाठ, कोल्हार खुर्द पोलीस हेड कॉन्स्टेबल देविदासजी कोकाटे, राजू वरपे, भागवत शिरसाठ, प्रकाश चिखले, बापूसाहेब लोखंडे, संतोष शिरसाठ, गणेश ढाकणे, ज्ञानदेव शिरसाठ, डॉक्टर संतोष शिरसाठ ,रामनाथ सिरसाठ भाऊसाहेब लोंढे, गोपीनाथ दळे , दिगंबर घोगरे, ज्ञानदेव घोगरे ,गाढे पाटील, बाबजी सिरसाठ, दिलीप घोगरे, पैलावान बंडुभाऊ भोसले, प्रदिप भोसले, (पप्पु दादा) अंतुवन भोसले, अशोक जाधव, दिगंबर जाधव, विष्णू गायकवाड, दादाभाई शेख, कुस्ती समालोचन शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख शाम भाऊ गोसावी ,यांनी केले

कुस्ती लावणे साठी पैलवान दत्तु जाधव पैलवान राकेश यांनी पैलवानांच्या कुस्ती लावण्यासाठी योग्य नियोजन केले आनंद मय वातावरणात श्री विरभद्र बिरोबा महाराजांची यात्रा उत्साहात पार पडली

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *