संगमनेर । झुंझार न्यूज

कष्टाळू, धार्मिक आणि सामाजिक वृत्तीचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील रहिवासी कै. मच्छिंद्र रेवजी तांबे यांचे प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राद्ध) येत्या रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कै. मच्छिंद्र तांबे हे आपल्या हसमुख आणि विनोदी स्वभावामुळे परिसरात सर्वांचे परिचयाचे होते. अत्यंत कष्टप्रद परिस्थितीतून त्यांनी आपला संसार उभा केला. आयुष्यात आलेल्या संकटांवर मात करत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करून समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याची छाप संपूर्ण पानोडी ग्रामस्थांवर आहे. त्यांच्या निधनाने तांबे परिवारावर कोसळलेला दुःखाचा डोंगर अजूनही कायम असून, “बाबा, तुमची आठवण प्रत्येक क्षणी येईल” अशा शब्दांत कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पुण्यस्मरणानिमित्त सकाळी १० ते १२ या वेळेत हनुमान मंदिर, संगमनेर जवळ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. स्वरगंधर्व बाबा महाराज मगर चिंचपूरकर यांच्या संगीतमय प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. या अध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन तांबे परिवाराने केले आहे.


या कार्यक्रमाचे नियोजन पत्नी गं.भा. लहानबाई मच्छिंद्र तांबे, मुले श्री. रवींद्र आणि श्री. राहुल तांबे, मुली सौ. कल्पना विजय डमाळे व सौ. अर्चना भारत वर्पे, तसेच बंधू श्री. विठ्ठल तांबे, श्री. नामदेव तांबे, श्री. जालींदर तांबे यांनी केले आहे. यासोबतच पुतणे बापूसाहेब, राजेंद्र, विजय, महेश, संजय, रावसाहेब, विनायक, गणेश तांबे आणि नातवंडे स्वराज, यश, सिद्धी व समस्त तांबे परिवार, नातेवाईक आणि पानोडी ग्रामस्थ या दुःखद प्रसंगी सहभागी आहेत.

श्रद्धांजली आणि प्रवचन सोहळ्यासाठी सर्व स्नेह्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शोकाकुल तांबे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *