झरेकाठी । झुंझार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील स्वर्गीय चंद्रभान मुरलीधर वाकचौरे यांची कन्या व अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील अभिनव शिक्षण संस्थेचे अभिनव कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य कुसुम चव्हाण यांनी रसायनशास्त्र विषयात पीएचडी पदवी संपादन केली आहे.

सनराईज विद्यापीठ अलवर राजस्थान या यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आपला संशोधन प्रबंध पूर्ण केला असून त्यांच्या या यशामुळे अभिनव शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेत मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रा कुसुम चव्हाण यांचा संशोधन विषय Innovative Analytical approaches for Bioactive Compound analysis & their Applications असा असून बायोऍक्टिव्ह संयुगे हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. हे रासायनिक घटक फळे, भाज्या, कडधान्य, सुकामेवा आणि औषधी वनस्पतींमध्ये नैसर्गिक रित्या आढळतात आणि मानवी शरीराच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम करतात याबाबत विश्लेषणात्मक तंत्रे एनालिटिकल टेक्निक्स म्हणजेच पदार्थाचे गुणधर्म रचना आणि त्यातील घटक ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वैज्ञानिक पद्धती चा अभ्यास याद्वारे करण्यात आला. रसायनशास्त्र विषयांमध्ये या तंत्राचे महत्व अनन्यसाधारण आहे.

प्रा. कुसुम चव्हाण यांना डॉ. हेमंत कुमार सिंग यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन कार्य यशस्वीरित्या पूर्णत्वास नेले. शैक्षणिक क्षेत्रात १६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रा कुसुम चव्हाण यांनी एम एस सी बी एड , एम एड, बीए जर्नालिझम अशी उच्च शैक्षणिक पात्रता संपादन केली आहे.त्यांनी आत्तापर्यंत नऊ संशोधन लेख प्रकाशित केले असून चार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवला आहे तसेच एक पेटंट व एक पुस्तक देखील प्रकाशित केले आहे. त्यामुळे अध्यापनासोबत संशोधन क्षेत्रातही त्यांनी भक्कम स्थान निर्माण केले आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले, संस्थेचे सचिव विक्रम नवले, कॅम्पस डायरेक्टर तथा कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. जयश्री देशमुख संस्थेच्या सहसचिव प्राचार्य अल्फोंसा डी, प्रशासन अधिकारी दिलीप कुमार मंडलिक , ज्ञानेश्वर वाणी, सोमनाथ डोळे,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

प्रा कुसुम चव्हाण यांच्या या यशामध्ये पती डॉ संतोष चव्हाण,किरण वाकचौरे, , व कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी यांच्या पाठिंब्यामुळेच त्यांनी हे यश संपादन केले असल्याचे भावना व्यक्त केली आहे. त्यांना पुढील शैक्षणिक व संशोधन वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *