संगमनेर । झुंझार न्यूज
भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाचा इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी हेरंब खाडे ह्याची नवोदय परीक्षा व सैनिकी स्कूलमध्ये निवड होऊन दुहेरी यशाचा झेंडा फडकविला.

सह्याद्री विद्यालयामध्ये हेरंब खाडे याचा संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एस.एम.खेमनर उपस्थित होते.

हेरंबने मेहनतीच्या जोरावर हे दुहेरी यश संपादन केले आहे.हेरंबचे वडिल पोलीस कॉन्स्टेबल;तर आई प्राथमिक शिक्षिका आहे. त्याचे अभ्यासाची चिकाटी व वर्गशिक्षिका श्रीमती आहेर उर्मिला मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. हेरंबने नवोदय परीक्षा निवडीची विद्यालयाची परंपरा कायम राहिली.

यावेळी बोलताना माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की, सह्याद्री विद्यालयामध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांमधील गुण हेरले पाहिजे. त्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांसाठी थोडा वेळ द्या. पाल्यांच्या आवडीनिवडी तपासा. मुलेही पालकांची भविष्यात मोठी शिदोरी असून मुलांच्या जडणघडणीत शिक्षक आणि पालकांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असल्याचे ते म्हणाले यावेळी त्यांनी हेरंब खाडे यांची कौतुक केले.

या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुधीरजी तांबे साहेब, सेक्रेटरी मा.सुमंतजी कोल्हे साहेब,नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ .जयश्रीताई थोरात ,संगमनेर नगरपालिकाच्या नगराध्यक्षा मैथीलीताई तांबे, संस्थेचे खजिदार अॅड. ज्ञानेश्वर सांगळे, संचालक प्रा.बाबा खरात सर ,विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एम खेमनर, उपमुख्याध्यापिका सुरेखा दिघे परिवेक्षिका संगीता रणशूर, पर्यवेक्षक किशोर देशमुख व अण्णासाहेब दिघे, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर सेवकांनी हेरंबचे अभिनंदन करून त्याला पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
