{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

बैलगाडा शर्यत, कुस्त्या आणि तमाशाची मेजवानी!

संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे २०२६ सालातील हनुमान जयंती व ग्रामदैवत श्री खंडोबा महाराज यात्रा उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १ एप्रिल ते शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ या कालावधीत हा यात्रा उत्सव संपन्न होणार असून, यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निळवंडे येथे दरवर्षी सालाबादप्रमाणे हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला जातो. याही वर्षी बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार सत्यजीत तांबे , डॉ जयश्रीताई थोरात यांच्या सहकार्याने तरुण मित्र मंडळ व जेष्ठ कार्यकर्त्यांनी यात्रेची जय्यत तयारी केली आहे .

यात्रेची सुरुवात बुधवार, १ एप्रिल रोजी सायंकाळी काठी मिरवणुक व ८ वाजता ‘आवाज की दुनिया‘ (तळेगाव) या बहारदार ऑर्केस्ट्राने होईल. त्यानंतर गुरुवार, २ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली ‘बैलगाडा शर्यत’ आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ८ वाजता भव्य दारुगोळा उडवून आतषबाजी केली जाईल, तर रात्री १० वाजता श्रद्धेचा भाग असलेला ‘जागरण गोंधळ‘ संपन्न होईल.


उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवार, ३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता भव्य कुस्त्यांचा हगामा रंगणार आहे. यामध्ये पंचक्रोशीतील मल्ल आपले कसब पणाला लावतील. यात्रेची सांगता रात्री १० वाजता महाराष्ट्राची लोककला असलेल्या काळू-बाळू यांच्या सुप्रसिद्ध ‘लोकनाट्य तमाशा’ने होणार आहे.


या उत्सवासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ उकिरडे, ग्रामपंचायत सदस्य विकास पवार, ग्रा प सदस्य प्रभाकर रामभाऊ पवार, सुदाम शेठ उकिरडे, भाऊसाहेब रामनाथ पवार, विनोद अरुण पवार, शशिकांत सुभाष पवार, गोविंद उकिरडे , दत्तात्रय सयराम पवार,भाऊसाहेब सूर्यभान पवार,अरुण सुदाम पवार,कैलास मारुती पवार,संदीप साहेबराव पवार,रोहिदास सीताराम पवार,संदीप मधुकर उंबर्डे, उत्तम गणपत पवार, नितीन सुदाम पवार, प्रशांत विलास गायकवाड शांताराम राधू गायकवाड, अक्षय विश्वास गायकवाड, प्रवीण (हेमंत)पवार, आबासाहेब दत्तात्रय पवार, अण्णासाहेब सदाशिव पवार, गोरक्ष निवृत्ती पवार, मेजर दत्तात्रय बाबजी पवार, संजय काळे, गणेश एकनाथ पवार,गणेश माधव पवार, सुनील कचेश्वर बिडवे, दत्तात्रय बिडवे, सतीश नानासाहेब आहेर, विठ्ठल कचेश्र्वर केरे,अशोक शंकर केरे, अशोक बाबुराव वारे, भाऊसाहेब सहादू वारे,सतीश अण्णासाहेब पवार, अरुण टपाल, गंगाधर बाबुराव पवार ,गंगाधर विठ्ठल पवार,पोपट रामभाऊ पवार, सुभाष शिवनाथ पवार, बाळासाहेब राजाराम पवार, अवधूत दौलत पवार, पोपट दामू पवार , अशोक श्रावण उंबर्डे , सुभाष यमनाजी उकिरडे यांच्यासह तरुणांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेत आहे.


या निमित्ताने निळवंडे व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आणि सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन निळवंडे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *