शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दादा गुरु व सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज

 

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

 

 

 

श्रीक्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी दादा गुरु, मान्यवर संतांनी गुरु , व महंत रामगिरीजी,एकाचवेळी उपस्थिती लावत आध्यात्मिक वातावरण अधिक भारावून टाकले. महंत दादा गुरु महाराज, सरलाबेटाचे महंत रामगिरी महाराज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

संतांच्या आगमनामुळे शिर्डी परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. साईबाबांच्या समाधी मंदिरात त्यांनी शांततेत व भक्तिभावाने पूजा-अर्चा केली. यावेळी त्यांनी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करून देश-समाजाच्या कल्याणासाठी मंगल कामना व्यक्त केल्या.
शिर्डी संस्थानच्या वतीने सर्व संतांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. संस्थानच्या अधिकाऱ्यांनी त्यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित केले. तसेच मंदिर परिसरात संतांच्या उपस्थितीमुळे भाविकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले होते.

महंत एकाचवेळी शिर्डीत दाखल झाल्याची बातमी कळताच भाविकांनी मोठ्या प्रमाणावर मंदिरात गर्दी केली. अनेक भक्तांनी या संतांचे दर्शन घेत आशीर्वादही घेतले. काही भक्तांनी संतांच्या उपस्थितीला “दुर्मिळ योग” मानत समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी संतांनी भक्तांना सदाचार, श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला. साईबाबांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी केले. समाजात एकोपा, प्रेम आणि सेवा भावना वाढविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

संतांच्या या एकत्रित भेटीमुळे शिर्डीतील आध्यात्मिक वातावरण अधिक समृद्ध झाले असून, भाविकांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला.

 

 

 सोमनाथ डोळे झरेकाठी

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *