देवगड येथे जाऊन महाराजांची घेतली भेट

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

नेवासा तालुक्यातील देवगड संस्थांचे पिठाधीश महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले असून काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देवगड येथे जाऊन भास्करगिरी महाराज यांचे सांत्वन केले.

देवगड येथे महंत भास्करगिरी महाराज यांची माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांत्वन पर भेट घेतली. यावेळी समवेत अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

 

मातोश्री सरूबाई पेसोडे यांचे नुकतच निधन झाले असून महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांना मातृशोक झाला आहे. देवगड देवस्थान हे उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण व भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असलेले क्षेत्र आहे.

 

यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी संत परंपरेचा समृद्ध वारसा जोपासत सामाजिक सलोखा निर्माण करून मठाला मोठे अधिष्ठान प्राप्त करून दिले आहे. देवगड देवस्थान सर्वांचे मोठे श्रद्धास्थान आहे. महाराजांच्या दुःखामध्ये आपण सहभागी असल्याचे ते म्हणाले.

 

लोकनेते बाळासाहेब थोरात हे वारकरी संप्रदायाचे पाईक असून त्यांनी कायम संत महात्मे यांचा आदर केला आहे. यावेळी नेवासे येथील विविध कार्यकर्ते व धार्मिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *