आश्वी । झुंझार न्यूज

डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक जेहूर भाई शेख आणि त्यांच्या पत्नी ६ मे रोजी पवित्र हज यात्रेसाठी रवाना होत आहेत. या धार्मिक प्रवासाच्या निमित्ताने शिबलापूर येथील ग्रामस्थांच्या वतीने शेख दाम्पत्याचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमातून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले असून, मोठ्या उत्साहात त्यांना निरोप देण्यात आला.

जेहूर भाई शेख हे डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात संचालक म्हणून कार्यरत होत, सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असतो. ६ मे रोजी ते हज यात्रेसाठी प्रस्थान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिबलापूर येथील ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या

या सत्कार समारंभास ज्येष्ठ नेते आण्णासाहेब म्हस्के, शिबलापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अशोकराव वालझाडे, प्रकाशराव शिंदे, राजेंद्र जाधव, संपतराव नागरे, भानुदास शिंदे, भिमराज बोंद्रे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शेख यांच्या कामाचे कौतुक करत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, अशी प्रार्थना केली.

जेहूर भाई शेख हे विखे पाटील परिवाराचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्या या हज यात्रेनिमित्त राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शेख दाम्पत्याला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.


सत्काराला उत्तर देताना जेहूर भाई शेख भावूक झाले होते. त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले आणि “गावाने दिलेले प्रेम आणि आदर हीच माझ्या कामाची खरी पावती आहे,” अशा भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमामुळे शिबलापूर परिसरात आनंदाचे वातावरण असून, सर्वधर्मीय बांधवांनी यावेळी शेख यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed