{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

झरेकाठी व परिसरामध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्याची मागणी

 

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी व परिसरातील गावांमध्ये वाढत्या चोरी व दरोड्याच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने बंद पडलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा तात्काळ सुरू करावी, अशी मागणी जनसेवा युवा मंच सदस्य व भाजपा बुथ प्रमुख सोमनाथ डोळे यांनी केली आहे.

 

सोमनाथ डोळे यांनी सांगितले की, मागील पंचवार्षिक काळात ही ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली होती. मात्र, शासनाकडे आवश्यक शुल्क न भरल्यामुळे सध्या ही यंत्रणा बंद पडली आहे. गेल्या आठ दिवसांपासून झरेकाठी व पंचक्रोशीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित झाल्यास गुन्हेगाराचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होईल, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षितेची भावना निर्माण होईल, असे त्यांनी नमूद केले, ग्रामपंचायतीने. यंत्रणा अद्ययावत. करून अधिक मोबाईल क्रमांक सामाविष्ट करावेत आणि आपत्कालीन संदेश पाठवण्यासाठी क्रमांक प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावी अशीही मागणी त्यांनी केली आहे ‌

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed