आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील ‘बालपन इंग्लिश स्कूल’ने आपल्या यशाची परंपरा कायम राखली असून, नुकत्याच जाहीर झालेल्या शालेय निकालात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत कु. अदिती संदीप गायकवाड हिने ९२.२०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.


विद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपली मोहोर उमटवली आहे. अदिती गायकवाड हिच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक होत आहे. तिच्यापाठोपाठ कु. ईश्वरी तुषार मांढरे हिने ८८.८०% गुण मिळवून द्वितीय, तर चि. आदित्य महेश गायकवाड याने ८७.८०% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची यादी खालीलप्रमाणे
शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे. यामध्ये
ओवी भारत शिंदे – ८७.००%
वेदांत शरद बिडवे – ८६.४०%
तन्वी कैलास जाधव – ८६.४०%
लतिका विलास गीते – ८५.२०%
पुनम सचिन वाणी – ८४.६०%
स्मित संतोष गोडगे – ८४.२%
तसेच प्रज्वल अमित भंडारी (७९.८०%), संचिता बाबासाहेब कदम (७६.८०%), वेदांत महेश बालोटे (७६.००%), हर्षवर्धन संतोष जाधव (७५.२०%), राज विलास शिंदे (७४.४०%), समीक्षा योगेश भालेराव (७४.४०%), आरुष योगेश ताजणे (७३.४०%), समृद्धी अनिल सोसे (७२.६०%) आणि रेणुका जालिंदर सोसे (७१.८०%) या विद्यार्थ्यांनीही उत्तम यश संपादन केले आहे
विद्यार्थ्यांच्या या यशात शाळेचे मॅनेजमेंट, मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. मुलांनी अभ्यासात दाखवलेले सातत्य आणि पालकांनी दिलेला पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे पानोडी परिसरातून व संगमनेर तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातील वाटचालीस सर्व गुणवंतांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



