टक्केवारीसाठी कामे रखडवली जात असल्याचे ग्रामस्थांचे निवेदन
संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी ते सावरगाव तळ या रस्त्याचे जवळपास दोन वर्षांपासून रुंदीकरण व डांबरीकरण काम सुरू आहे.पालकमंत्री, विद्यमान आमदार, सरपंच, कार्यकर्ते यांनी 3 ते 4 वेळा उद्घाटन देखील केले.पण अजूनही काम अर्धवट आहे.अत्यंत दुर्दशा रस्त्याची झाली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.
तालुक्यामध्ये मागील दीड वर्षापासून टक्केवारी वाढली आहे त्यामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत. अनेक गावांमधून रस्त्यांची कामे तशीच पडून आहे. फक्त सोशल मीडिया आणि फ्लेक्स बाजी केली जात आहे. याबाबत सावरगाव तळ येथील युवक कार्यकर्त्यांनी ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की ठेकेदार 2 दिवस काम करतो तर महिनाभर परत कामाकडे डोकावत पण नाही. प्रशासनाचे तर अजीबातही लक्ष कामा कडे नाही.अर्धवट कामामुळे अपघात होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अर्धवट कामामुळे चंदनापुरी ते सावरगाव तळ परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या धुळीमुळे कर्करोग होईल की काय या भीतीने नागरिक भयभीत झाले आहे.अधिकारी, व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्याचा फायदा ठेकेदार घेत असल्याची चर्चा नागरिक करत आहे.
संगमनेर तालुक्यातील विविध कॉन्ट्रॅक्टर हे टक्केवारीमुळे त्रस्त झाली असून त्यांचे पेमेंट येत नसल्याने काम बंद असल्याचे ठेकेदार बोलतो. पण आजूबाच्या तालुक्यातील गावात रस्त्याचे काम काही प्रमाणात आहे.
तब्बल दोन वर्षांपासून सुरू असलेले काम कधी पूर्ण होईल या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पालकमंत्री व आमदार हे उद्घाटन करून गेले खरे पण पाठीमागे नेमके काय झाले याची साधी चौकशी ही त्यांनी केली नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहे.
पुढील आठ दिवसांत काम पूर्ण झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यातील असा इशारा सावरगाव तळ येथील युवक कार्यकर्ते व नागरिकांनी दिला आहे.
फक्त उद्घाटने करतात पुन्हा फिरकत नाहीत
संगमनेर तालुका हा विकासातून पुढे आलेला आहे मात्र मागील दीड वर्षापासून तालुक्यामध्ये उद्घाटनांचा धडाका होतो. कोणतेही काम होत नाही. टक्केवारी मागितली जाते. यामुळे अनेक कामे रखडली जात असून फक्त उद्घाटन करतात परत फिरकून पाहिले जात नाही त्यामुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनी विरुद्ध मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

